अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी (गुरुवार) कुणीही माघार घेतली नाही. त्यामुळे सध्या निवडणुकीच्या रिंगणात ३० उमेदवार कायम आहेत. आज, शुक्रवार (९ ऑक्टोबर) उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. त्यानंतर सायंकाळपर्यंत निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. ६ ऑक्टोबरपर्यंत एकूण ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे गाजी मोहम्मद जाहेरोश यांचा अर्ज बाद झाला. निवडणूक निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव ही प्रक्रिया पूर्ण करत आहेत. रिंगणातील ३० उमेदवारांमध्ये ३ राष्ट्रीय/राज्य पक्षांचे, ४ नोंदणीकृत पक्षांचे आणि २३ अपक्ष उमेदवार आहेत.
विधान परिषद निवडणुकीतून पहिल्या दिवशी कुणीही माघार घेतली नाही:30 उमेदवार रिंगणात, आज शेवटचा दिवस; सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार