मुखेड (प्रतिनिधी)- मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेवर अत्त्याचार करणाऱ्या नराधमाला मुखेडचे विशेष न्यायाधीश एस.पी. देशमुख यांनी २० वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.
या बाबत माहिती अशी आहे की,अल्पवयीन बालिका एकटी मुलगी दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी शाळेत आली असता पिराजी मारोती गवाले हा आला व पिडीतेस म्हणाला की आपण जत्रेला जावू तो ओळखीचा असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून बालिका त्यांच्या गाडीवर बसली असता त्यांने गाडी निर्जन ठिकाणी नेली व बालिकेचा हाथ धरुन शेतात झुडपामध्ये घेवून गेला बालिकेने नकार दिला असता त्यांन जबरीने लेगिंक अत्याचार केला. यानंतर बालिका ही घरी आल्यानंतर सदरची घटना आईला सांगितली तेव्हा तिच्या फिर्यादीवरुन आरोपी पिराजी मारोती गवाले विरुध्द गु.र.क्र. २०/२०२३ अन्वये मुखेड पोलीस स्टेशन येथे भा. द. वी. चे कलम ३७६, ३६३, ५०६ व कलम ४ व ८ पोक्सो अन्वये गुन्हा नोंद झाला. सदर गुन्हाचा तपास पोलीस उप निरीक्षक गजानन काळे यांनी करुन न्यायलयात दोषारोप पत्र दाखल कले .
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासले. साक्षीदारांची साक्ष व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. पी. देशमुख साहेब यांनी दिनांक १८/०३/२०२६ रोजी आरोपी पिराजी मारोती गवाले कलम ४ पोक्सो अंतर्गत दोषीधरुन आरोपीस २० वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपये रोख दंड कलम ३६३ भा. द. वी अन्वये ३ वर्ष कारावास ५ हजार रुपये दंड रुपये दंड तसेच कलम ५०६ अन्वये १ वर्ष कारावास आणि १ हजार दंड कलम ८ पोक्सो अन्वये ३ वर्ष कारावास ५ हजार रोख दंड ठोठावला आहे. या सर्व शिक्षा आरोपीला एकत्र भोगायच्या आहेत.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ऍड. गजानन भिकाजी खिल्लारे यांनी काम पाहिले. मुखेडचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार दोसलवार, ग्यानोबा केंद्र, राऊबाई गुट्टे यांनी सहकार्य केले.
