![]()
प्रतिनिधी | खंडाळा वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील एमबीबीएस डॉ. धनश्री भरत वेळंजकर यांचे आजोबा लक्ष्मण काशिनाथ वेळंजकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ग्रामीण भागातील गरजू नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे २५ जानेवारी रविवार रोजी येथील संत गोरोबाकाका मंदिर परिसरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. धनश्री वेळंजकर यांनी स्वतः रुग्णांची तपासणी करत मार्गदर्शन केले. यावेळी २६ नागरिकांची तपासणी करण्यात आली, तर २२ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान करत सहभाग नोंदवला. याप्रसंगी राजु वेळंजकर, ओमकार धारक, सोमनाथ व्यवहारे, गोपाळ अंबेकर, नलिनी कपे, गजेश वेळंजकर, शशिकांत वेळंजकर, योगेश वेळंजकर सह नागरिक उपस्थित होते.
खंडाळ्यात आरोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन:ग्रामीण भागातील गरजू नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
