![]()
सिल्लोड तालुक्यातील शिवना गावात स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यानसोमवारी (२६ जानेवारी) ऐतिहासिक महत्त्वाची रचना सापडल्यानेपरिसरात कुतूहल निर्माण झाले आहे. खोदकाम करत असताना लाखोरीविटा व दगडांच्या बांधकामातून तयार झालेले घुमटाकार भुयाराची रचना उघडकीस आली. ही बांधकामाची रचना पाहता तीप्राचीन काळातील असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातअसून, या भागात पूर्वी एखादी वास्तू, निवासस्थान किंवा सार्वजनिक उपयोगाची इमारत अस्तित्वात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील जैन समाज मंदिर परिसरात वास्तव्यास असणारे अशोक भगवान वाघ यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. घराला लागून असलेल्या रिकाम्या जागेत स्वच्छतागृहासाठी त्यांनी खोदकाम केले. दरम्यान, या ठिकाणी पोकळ जागा दिसून आली. नेमका हा प्रकार काय म्हणून संपूर्ण भाग मोकळा केला. त्यावेळी जुने बांधकाम केलेले घुमटाकार भुयार आढळून आले. मंडळ अधिकारी विजय शेळके, ग्रामविकास अधिकारी आर. जी. गंगावणे, पोलिस विजय पवार, प्रतीक जोशी, सुनील वाघ, नदीम शेख व ग्रामस्थांसमक्ष पंचनामा केला. घटनेचे स्वरूप स्पष्ट न झाल्याने काम बंद केले. धान्य कोठाराची रचना असण्याची शक्यता शिवना गाव हे मुघलकालीन परगणा होते. मोहम्मद घैसखान हा परगण्याचा प्रमुख होता. मुघल राजवटीत धान्याचीसक्तीने वसुली करण्यात येत होती. तत्कालीन लोकांनीधान्य साठवण्यासाठी भूमिगत कोठारे तयार केली. तेथेधान्य लपवून ठेवले जात असल्याने ही रचना भूमिगतधान्य कोठार असण्याची शक्यता आहे. – विजय पगारे, स्थानिक इतिहास संशोधक, अजिंठा
शिवन्यात खोदकामात आढळले प्राचीन घुमटाच्या आकाराचे भुयार:धान्य कोठाराची रचना असण्याची शक्यता
