घराच्या बांधकामात सापडले भव्य पुरातन भुयार:सिल्लोडच्या शिवना येथे खोदकामात मंदिरासारखी कळसाकृती रचना उघड




सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे सोमवारी दि.२६ स्वच्छतागृहाचे बांधकाम करताना मंदिरासारखी कळसाकृती रचना असणारे भुयार सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या विटा व दगडाचे बांध काम असलेले हे भुयार नेमके कशाचे आहे याचा उलगडा मात्र गावातील जुने जाणकार व जेष्ठान्नाही करता आलेला नाही. या ऐतिहासिक पुरातन वास्तू शोधामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले असून, याठिकाणी सकाळ पासून बघ्यांची गर्दी जमली आहे. साधारण ८०० स्केअर मिटर मोठे घुमटाकार छप्पर असलेले हे बांधकाम आहे. महसूल प्रशासनातर्फे मंडळ अधिकारी, पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या समक्ष पंचनामा करून तहसीलदार यांच्यामार्फत पुरातत्व विभागाला ही माहिती देण्यात आली आहे. येथिल जैन समाज मंदिर परिसरात वास्तव्यास असणारे अशोक भगवान वाघ यांनी नुकतेच नवीन घराचे बांधकाम सुरु केले आहे. त्याशेजारी रिकाम्या जागेत स्वच्छतागृहासाठी खोदकाम करताना पोकळ जागा सापडली. नेमका हा प्रकार काय? म्हणून संपूर्ण भाग खोदून मोकळा केला, त्यावेळी जुने बांधकाम केलेले घुमटाकार भुयार आढळून आहे. याची रचना गोलाकार असून, दोन्ही बाजूच्या भिंतीला दिवे लावण्यासाठीची जागा सोड लेली आहे. याठिकाणी साधू संत किंवा महान तपस्वी वास्तव्यास असेल अशी चर्चा गांवात रंगू लागली आहे. घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी विजय शेळके,ग्राम विकास अधिकारी आर.जी.गंगावने,प्रतीक जोशी,सुनील वाघ, नदीम शेख यांनीं ग्रामस्थ समक्ष पंचनामा करून घटनेचे स्वरूप स्पष्ट न झाल्याने व कोणत्याही धर्माच्या भावना दुखवील्या जाऊ नये या उद्देशाने पुढील काम बंद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *