नागपुरात गणेशोत्सवादरम्यान ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी ‘नॉइज फ्री नागपूर’ पोर्टल सुरू झाले. यावर आलेल्या पाचपैकी तीन तक्रारींवर पोलिसांनी अर्ध्या तासात कारवाई केली. मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टिम आणि डीजेबाबत या तक्रारी होत्या. तक्रार मिळताच पथके घटनास्थळी पाठवून डीजे बंद केले, कारवाई झाली. हे पोर्टल नागपूर मनपा आणि पोलिसांनी संयुक्तपणे सुरू केले आहे. येथे ३० मिनिटांत प्रतिसाद देण्याची व्यवस्था आहे. पोलिसांनी ध्वनीमापन यंत्रांनी ध्वनी पातळी तपासली. मर्यादा ओलांडणाऱ्या ७ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९ साऊंड सिस्टिम जप्त केल्या. राजीव नगर, मिहान, स्वावलंबी नगर, वर्धा रोड, खामला, त्रिमूर्ती नगर, अभ्यंकर नगर, आत्मा इंक्लेव्ह, मानकापूर या भागांतून आलेल्या तक्रारींवर तत्काळ कारवाई झाली.
नागपुरात ध्वनीमर्यादा भंग केल्याप्रकरणी 7 गणेश मंडळांवर गुन्हे:'नॉइज फ्री नागपूर' पोर्टलवर 5 पैकी 3 तक्रारींवर अर्ध्या तासात कारवाई, 9 साऊंड सिस्टिम जप्त