Dr. Aparna Govil Warns of GERD Risk; Heartburn Not Simple Acidity



छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे किंवा जेवणानंतर अस्वस्थ वाटणे यांसारख्या तक्रारींकडे अनेकदा साधी ॲसिडिटी म्हणून दुर्लक्ष केले जाते. मात्र, ही लक्षणे वारंवार दिसत असतील, तर तो ‘गॅस्ट्रो-इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज’ (GERD) असू शकतो. याकडे दुर्लक्ष करणे धो

.

डॉ. गोविल यांच्या मते, ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याच्या तक्रारी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांत आढळतात. तिखट-मसालेदार पदार्थ खाणे, वेळेवर न जेवणे किंवा जड जेवणानंतर होणारा त्रास अनेकजण घरगुती उपायांनी कमी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, ‘जीईआरडी’मध्ये पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येते. यामुळे छातीत जळजळ, घशात दुखणे, सतत ढेकर येणे, कोरडा खोकला, आवाज बसणे तसेच झोपताना त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. काही रुग्णांमध्ये छातीत दुखणे इतके तीव्र असते की हृदयविकाराचा संशय येऊ शकतो.

लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान, तणाव, गर्भधारणा, मधुमेह, रात्री उशिरा जेवण करणे आणि जेवणानंतर लगेच झोपणे हे ‘जीईआरडी’चे प्रमुख जोखीम घटक आहेत. आठवड्यातून दोन-तीन वेळा छातीत जळजळ होत असेल, रात्री झोपमोड होत असेल किंवा दैनंदिन कामांवर परिणाम होत असेल, तर तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ ‘जीईआरडी’कडे दुर्लक्ष केल्यास अन्ननलिकेला सूज, जखमा, अरुंदता तसेच ‘बॅरेट्स इसोफॅगस’सारखे गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे छातीत जळजळ ही किरकोळ समस्या न समजता वेळेवर उपचार घेणे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *