डॉ. संग्राम पाटील यांना १५ तासांनंतर सोडले; पोलिस कारवाईवर तीव्र निषेध
Oplus_131072
डॉ. संग्राम पाटील यांना १५ तासांनंतर सोडले; पोलिस कारवाईवर तीव्र निषेध
नांदेड/जळगाव (प्रतिनिधी) — डॉ. संग्राम पाटील यांना आज पहाटे २ वाजल्यापासून अटकाव करून ठेवण्यात आले होते. तब्बल १५ तासांच्या अटकावानंतर अखेर त्यांची सुटका करण्यात आली असून ते जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील त्यांच्या गावाकडे रवाना झाले आहेत.
डॉ. पाटील यांच्याकडे युके (United Kingdom) चे नागरिकत्व असल्याने पोलिसांना त्यांना अटक करता आली नाही. तथापि, सत्तेचे सत्य मांडणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांकडून अटकाव व छळ सहन करावा लागल्याचा आरोप होत असून या संपूर्ण घटनेचा विविध स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, भारतातून प्रस्थान करताना संबंधित पोलिस ठाण्यात उपस्थित राहून पोलिसांना भेटण्याचे बंधन डॉ. पाटील यांच्यावर घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अटीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा आणण्याचा हा प्रकार असल्याची टीका होत आहे.
या प्रकरणामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था, पोलिसांची भूमिका आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
