Sambhaji Brigade Demands Criminal Cases James Laine Oxford University | ऑक्सफर्ड विद्यापीठावर फौजदारी गुन्हे दाखल करा: संभाजी ब्रिगेडची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा – Pune News



छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या जेम्स लेन प्रकरणी ऑक्सफर्ड विद्यापीठासह संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या शैलीत आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्

.

जेम्स लेनच्या घृणास्पद व देशद्रोही लिखाणाला आता २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने आता माफी मागणे म्हणजे गुन्ह्याची कबुलीच असल्याचे ब्रिगेडचे म्हणणे आहे.

कामठे म्हणाले की, २००३ मध्ये छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पत्र पाठवले होते. दोन दशके त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता अचानक माफी मागणे ही नैतिकतेतून किंवा इतिहासप्रेमातून आलेली नाही. ही माफी न्यायालयीन कारवाईतून सुटका मिळवण्यासाठी रचलेला डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

पवार यांनी यावेळी भांडारकर संस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जेम्स लेनला संशोधनासाठी मदत करणाऱ्या, बदनामीकारक मजकुराला वैचारिक आधार देणाऱ्या आणि भारतीय इतिहासाचा अपमान करणाऱ्या भांडारकर संस्थेतील जबाबदार व्यक्तींवर सरकारने आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई केली नाही. हा सरकारी संरक्षणवाद नाही तर काय आहे, असा सवाल त्यांनी केला.

प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी विचारले की, २२ वर्षे ज्यांची तोंडे बंद होती, त्यांना आज अचानक माफी कशी सुचली? जर गुन्हा केला नव्हता तर माफी कशासाठी? आणि माफी म्हणजे गुन्ह्याची कबुली नाही का? भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर कारवाई होणार की नाही? जेम्स लेनला मदत करणाऱ्यांना सरकारी संरक्षण दिले जात आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

जर सरकार गप्प राहिले आणि आरोपींची सुटका झाली, तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून न्यायालयात लढेल आणि जनतेत सत्य मांडेल, असा इशारा शिंदे यांनी दिला.

या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे, मध्य जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कोंढाळकर, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, ज्‍योतिबा नरवडे आणि शहराध्यक्ष अविनाश मोहिते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *