Latur Municipal Election Eknath Shinde Shiv Sena Independent Candidates | एकनाथ शिंदेंचा लातूरमध्ये मोठा धडाका!: 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, विरोधकांसमोर विजयाचे तगडे आव्हान – Dharashiv News



लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी राजकीय खेळी करत आपली ताकद दाखवून दिली आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या तब्बल 17 अपक्ष उमेदवारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत शिवसेना पक्षात जाहीर

.

शिवसेनेत प्रवेश केलेल्या या 17 उमेदवारांमध्ये काही भाजपमधील नाराज, तर काही इतर पक्षांत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सर्वांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अधिकृतपणे हाती भगवा झेंडा घेतला. या घडामोडीमुळे अनेक प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांसाठी निवडणूक लढवणे आता अधिक सोपे झाले असल्याचे बोलले जात आहे. अपक्षांच्या या पाठिंब्यामुळे लातूर महापालिकेच्या सत्तासंघर्षात शिवसेनेचे पारडे जड झाले असून, विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

याबद्दल एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ते म्हणाले, लातूर महानगरपालिकेतील 17 अपक्ष उमेदवारांनी काल हाती भगवा झेंडा घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यात प्रामुख्याने श्रीकांत रांजणकर, मनोज जोशी, निलेश मांदळे, अर्चना कांबळे, अजय गजाकोष, प्रशांत बिरादार, शोभा सोनकांबळे, प्रशांत काळे, ओमप्रकाश नंदगावे, राहुल साबळे, नरसिंह घोणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष उत्तमराव लोंढे आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

यावेळी युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, विलास पारकर, धीरज देशमुख आणि लातूरचे माजी महापौर सुरेश पवार, शहरप्रमुख रविकांत चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख कुलदीप सूर्यवंशी, महिला जिल्हाप्रमुख अर्चना बिराजदार तसेच लातुर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते, अशी माहिती शिंदेंनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *