दिव्य मराठी ॲपच्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या विशेष मालिकेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, या मालिकेअंतर्गत आज प्रभाग क्रमांक 14 मध्ये चर्चा रंगली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी विकास, नागरिकांचे प्रश्न आणि
.
स्थानिक उमेदवार नसल्याचा मुद्दा उपस्थित करत उमेदवारांनी बाहेरील उमेदवारांवर टीका केली. प्रभागातील समस्या, नागरिकांच्या अडचणी आणि गरजा स्थानिक उमेदवारालाच नीट समजतात, त्यामुळेच जनता बाहेरून आलेल्या उमेदवारांना स्वीकारत नाही, असा दावा करण्यात आला. याआधीही बाहेरील उमेदवार नाकारल्याचा दाखला देत, आगामी निवडणुकीतही नागरिक स्थानिक नेतृत्वालाच पसंती देतील, असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार जफर खान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख समीर यांनी व्यक्त केला.
ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिक्स होते
काँग्रेसचे उमेदवार जफर खान म्हणाले की, एमआयएमचे आणि विकासाचे काही देणंघेणं नाही. त्यांचे राजकारण दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत पोळी भाजण्याचे आहे. आम्ही मात्र सर्वांना सोबत घेऊन काम करत असतो. आम्ही विकासाच्या मुद्द्यासाठी काम करत असतो त्यांना यासाठी काहीच काम करायचे नाही. ते व्हिजन विकास या सर्व गोष्टीपासून दूर आहेत, त्यामुळे काही बोलण्यासारखे त्यांच्याकडे नसल्याने ते कार्यक्रमाला आले नाहीत. आम्ही प्रामुख्याने लोकांना पाणी लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. कचऱ्याचा विषय मार्गी लावणार आहोत. तर ड्रेनेजचे पाणी हे पिण्याच्या पाण्यात मिक्स होत आहे त्याकडे आम्ही लक्ष घालणार आहोत.आमच्या संजयनगर-बायजीपुरा हा वॉर्ड असताना मी या परिसराचे नेतृत्व केलेले आहे. मनपामध्ये विरोधी पक्षनेतेपदावर काम केले आहे. यावेळी आम्ही चौथ्या दिवशी नागरिकांना पाणी देत होतो त्यावेळेस जायकवाडीमध्ये पाणी सुद्धा नव्हते. पण आज धरण पूर्ण भरलेले असताना पाणी 10 ते 12 दिवसांनी येते असे का होत आहे हे समजत नाही. आमच्या प्रभागात कचऱ्याचा मोठा विषय आहे. अनेक ठिकाणी कचरा साचलेला असतो, तो साफ केला जात नाही.आमच्या कार्यकाळात ही समस्या नव्हती. कारण आम्ही मनपाच्या कर्मचाऱ्यांकडून कामे करुण घेत होतो. भूमिगत गटार योजना आणत आम्ही विकास करण्याचा प्रयत्न केला. आमची सत्ता असताना पथदिवे लावले. पण आजचे सत्ताधारी नेते काहीच करत नाही, जनतेबद्दल त्यांना काहीच तळमळ दिसून येत नाही. जे होतंय ते होऊ द्या अशी सत्ताधारी आणि विरोधकांचे सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात काही कामे झाले नाही असे म्हणायचा विषयच नाही, कारण आम्ही जवळपास 450 कोटी रुपयांचे कामे केली आहेत. आमच्यावर राष्ट्रवादीचे नेते आरोप करत असतील तर त्यांचे ज्ञान कमी आहे असा टोला जफर खान यांनी लगावला आहे.

..ते वॉर्डाच्या विकासासाठी काय वेळ देणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख समीर म्हणाले की, ज्या लोकांना माध्यमांशी बोलायला वेळ नाही ते वॉर्डाच्या विकासासाठी काय वेळ देणार, हे जनतेने त्यांना विचारले पाहिजे. आमच्या प्रभागात भरपूर समस्या आहेत. आमच्या प्रभागात 10 दिवसांनी पाणी येते ते देखील दुषित पाणी. शहरासाठी 300 कोटी रुपयांची पाणी योजना देण्यात आली होती आज ती 3000 कोटी रुपयांपर्यंत गेली असली तरी लोकांना पाणी मिळालेले नाही. संभाजीनगरचे लोकं अजूनही पाण्यासाठी वाट बघत आहे. आमच्याकडे जर सत्ता दिली तर आम्ही बारामतीसारखा विकास करुण दाखवू. सत्ताधारी लोकांनी शहराच्या विकासासाठी कामे केली नाही असा आरोप त्यांनी केला आहे. शहरात आम्ही सत्तेत नव्हतो या ठिकाणी शिवसेना आणि भाजपची सत्ता होती त्यांनी कामे केलेली नाही. शिक्षण आणि आरोग्याचा मुद्द्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. ज्या ठिकाणी मोठे रस्ते करण्याची गरज आहे त्या ठिकाणच्या लोकांनी मागणी केली तर आम्ही त्यांच्यासोबत राहून ते काम करू. आम्ही पाण्याच्या मुद्द्यावर सर्वांत पहिले काम करणार आहोत.

प्रभागात महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न
राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र टाकळकर म्हणाले की, आमच्या मतदारसंघात भरपूर अडचणी आहेत. या प्रभागात काँग्रेसचे नगरसेवक आहेत त्यांनी अद्याप समस्या सोडवलेल्या नाहीत. आमच्या प्रभागात महिला सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. महिलांसाठी या प्रभागात कुठेही सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलेले नाही. तर ज्येष्ठांना आणि मुलांना खेळण्यासाठी एकही मैदान नाही. आमच्या परिसरातील मनपाच्या शाळेत सीबीएसइ पॅटर्नचे शिक्षण मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिक्षण, आरोग्य आणि महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर काम करणार आहोत. आमचा परिसर स्लम असल्याने परिसरातील नागरिकांना शिक्षणांचे महत्त्व नाही. परिसरातील नशेखोरीकडे वळणाऱ्या मुलांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारआहोत. जिन्सी परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचा विषय दिसून येतो. आमच्या भागात पथदिवे नाही या ठिकाणी एकाच घरातील उमेदवार असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. आम्ही धार्मिक स्थळांसमोर असलेल्या घाणींच्या मुद्द्यावर देखील लक्ष केंद्रित करणार आहोत.

काही उमेदवारांना लोकांसाठी वेळ नाही
काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सलीम पटेल बोरगावकर म्हणाले की, आम्ही सकाळी सहा वाजेपासून लोकांसाठी उपलब्ध असतो. एमआयएमने पॅरेशूट उमेदवार दिलेले आहेत त्यांचा दिवस दुपारी 3 नंतर सुरू होतो. ती मोठी माणसं आहेत लोकांसाठी त्यांना वेळ नाही. आमच्या प्रभागात सर्वांत मोठी समस्या ही पाण्याची आहे. ड्रेनेजची एक मोठी समस्या आमच्या प्रभागात दिसून येते. त्याकडे लक्ष दिले पाहिजे. आम्ही पाण्यासाठी आंदोलक केले आहेत, पाण्याची लाइन टाकण्याचे काम केले आहे.ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम, आणि रस्ते ही सर्व कामे केली आहेत, त्या केलेल्या कामावर मी निवडणुकीला सामोरे जाणार आहे. आमच्या परिसरात पाण्याची लाईन झालेली नाही, ती लाइन बदलणे हे सर्वांत महत्त्वाचे काम आहे. आमच्याकडे पॅरेशूट उमेदवार लादण्यात आलेला आहे. त्यांना आमच्या परिसरातील नागरिकांच्या समस्या काय समजतील. बाहेरील उमेदवार लोकांना खोटी आश्वासने देत आहेत. आम्ही स्थानिक उमेदवार आहोत. जनतेला सर्व काही माहिती आहे, ते त्यांना साथ देणार नाहीत. आम्ही प्रभागातील दुषित पाण्याचा विषय मार्गी लावणार आहोत.

मुलांना खेळण्यासाठी मैदाने विकसित करणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मुश्ताक खान म्हणाले की, आमच्या प्रभागात कचऱ्यासह पाणी, वीज, मोकाट कुत्रे, ड्रेनेज अशा अनेक समस्या आहे. माझ्या प्रभागातील लोकांना होणारा ड्रेनेजची समस्या सर्वात पहिले सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर मुलांना खेळण्यासाठी मैदाने विकसित करत ज्येष्ठ नागरिकांसाठी पार्क तयार करण्याचा आमचा मानस आहे. केवळ विकास कामे केले असे म्हणून जमणार नाही, लोकांच्या सहभागातून आपल्याला कचरा आणि स्वच्छतेचा मुद्यावर काम करावे लागेल.
प्रशासकांच्या कार्यकाळात अनेक समस्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अन्वर अली खान म्हणाले की, आमच्या प्रभागात अनेक ठिकाणी कचरा साचलेला असतो, तो कधीही साफ केला जात नाही. पाण्याचा जो विषय आहे तो लवकरात लवकर कसा सोडवला जाईल याकडे आमचे लक्ष आहे. आम्ही लोकांसाठी 24 तास उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करू. आम्ही प्रभागातील नागरिकांसाठी मैदाने विकसित करत ती मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करुण देण्याचा प्रयत्न करू. आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नाणी पार्क तयार करण्यासाठी प्रयत्न करू. प्रशासकांच्या कार्यकाळात अनेक समस्या तयार झाल्या त्याकडे लक्ष दिले गेले नाही. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमचा प्रभाग हा सुविधापासून वंचित आहे. आम्ही स्थानिक उमेदवार असल्याने परिसरातील समस्यांची आम्हाला जाण आहे. त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. नगरसेवक नसतानाही आम्ही लोकांसाठी कामे केलेली आहेत. बाहेरील लोकांना नागरिक निवडून देणार नाही, ते स्थानिकांना साथ देतील.
अशी आहे प्रभागाची व्याप्ती
छत्रपती संभाजीनगर मनपाच्या प्रभाग क्र 14 मध्ये नवाबपुरा, गवळीपुरा, रंगतीपुरा, बुक्कलगुडा, तेलंगवाडा, रणछोडदास गिरानी, निजामगंज कॉलनी, संजय नगर, गोड्डीपुरा, गंजेशीदा कब्रस्तान या भागांचा समावेश होतो. या भागात एकूण 45014 एवढे लोक राहतात.
अनेक ठिकाणी कचरा तुंबला
मोठी व्याप्ती असलेल्या या प्रभागात 15 पेक्षाही कमी घंटागाड्या आहेत. त्या नियमित येत नसल्याने नागरिक, व्यावसायिक, हॉटेलचालक कचरा टाकतात. त्यामुळे रस्त्यावर नियमित दुर्गंधी पसरलेली असते. बायजीपुरा , इंदिरानगर मधील रहिवासी शेख अफजल म्हणतात की, ‘आमच्याकडे चेंबर आणि पाण्याची समस्या खूप मोठी आहे. घंटा गाडी व्यवस्थित येते. मात्र पाण्याचा टाइम ठरलेला नाहीये. सकाळी, दुपारी कधी पण पाणी येत. 8-10 दिवसांनी पाणी येत. त्यातला आर्धा तास गढूळ पाणी येते.
