शिवाजीनगरात गांज्यासह आरोपी अटकेत; २५,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शिवाजीनगर परिसरात अमली पदार्थांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका इसमाला अटक करून त्याच्याकडून गांजा व रोख रक्कम असा एकूण २५,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाजी मंडई, दातार चौक परिसरात २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद मुजाहिद पि. मोहम्मद इशरत (वय २०, व्यवसाय मजुरी, रा. भाजी मंडई, दातार चौक, नवी आबादी, नांदेड) असे आहे. त्याच्याकडून १ किलो २०० ग्रॅम सुकलेला गांजा (किंमत अंदाजे २५,००० रुपये) व १०० रुपये रोख रक्कम असा एकूण २५,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक इरफान युनूस सय्यद व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.
पोलिसांनी अमली पदार्थांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला असून, अशा बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे.
Post Views: 83
