![]()
नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना गोंधळ बघायला मिळाला. देवानंद बिरारी त्यांच्या पत्नीसह जेव्हा अर्जाच्या संदर्भात विभागीय कार्यालयात आले तेव्हा एका उमेदवाराने त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे
.
नाशिकच्या प्रभाग 31 ड येथील दोन उमेदवारांमध्ये संघर्ष झाल्याचे समजते. भाजपचे उमेदवार बाळकृष्ण शिरसाट व देवानंद बिरारी यांच्यात संघर्ष झाला. तसेच देवानंद बिरारी यांच्या पत्नी यांनी बाळकृष्ण शिरसाट यांना कोणीही मतदान करू नये, असे प्रसार माध्यमांसमोर येत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे बाळकृष्ण शिरसाट यांनी आमच्यात कोणताही वाद झालेला नसल्याचे म्हटले आहे.
या सगळ्या गोंधळानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत उमेदवारांना बाहेर काढल्याचे पाहायला मिळाले. नाशिकच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या परिसरात काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना देवानंद बिरारी आणि त्यांच्या पत्नीवर अचानक हल्ला करण्यात आल्याचा दावा बिरारी यांनी केला आहे. तर असा कोणताही वाद झाला नसल्याचे बाळकृष्ण शिरसाट यांनी म्हटले आहे.
एकंदरीतच नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या नाट्यमय घटना गेल्या काही दिवसांत पाहायला मिळाल्या आहेत. त्यात आता आजच्या घटनेची भर पडली आहे. नाशिकमधील महापालिकेची निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचा अंदाज यावरून आपण लाऊ शकतो.
दहिसरमध्ये सुनीता राम नगीना यादव यांचा उमेदवारी अर्ज मागे
दरम्यान, तिकडे दहिसरमध्ये भाजपच्या माजी बंडखोर नगरसेविका सुनीता राम नगीना यादव यांनी आज वॉर्ड क्रमांक 1 मधून शिवसेना-भाजप संयुक्त उमेदवार रेखा राम यादव यांच्या समर्थनार्थ आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. दहिसरच्या भाजप आमदार मनीषा चौधरी आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी माजी नगरसेविका सुनीता रमणगीना यादव यांना उमेदवारी मागे घेण्याचे निर्देश दिले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बंडखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिल्याचे वृत्त आहे.
