Dr. Deshmukh, Pawar, Barahate became the first recipients of the ‘Wall of Fame’ | ‘वॉल ऑफ फेम’चे पहिले मानकरी ठरले डॉ. देशमुख, पवार, बारहाते: जिल्हा परिषदेच्या अभिनव उपक्रमाचे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उद्घाटन – Amravati News

0
e94cb06d-5d33-4bc4-a05c-61972f1c1839_1767282353824.jpg



अमरावती जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी ‘वॉल ऑफ फेम’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, १ जानेवारी रोजी, या ‘वॉल ऑफ फेम’चे उद्घाटन करण्यात आले. वरुडचे तालुका वैद्यकीय अधिकार

.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित एका छोटेखानी समारंभात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत डिजिटल वॉलचे कळ दाबून विमोचन करण्यात आले. या वॉलवरील छायाचित्रे महिनाभर प्रदर्शित राहतील आणि पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांचे फोटो लावण्यात येतील.

‘वॉल ऑफ फेम’च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व स्थायी, अस्थायी आणि कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवण्यात येणार आहे. यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जॉबचार्टनुसार नेमून दिलेल्या कामात १०० टक्के उद्दिष्टपूर्ती केलेली असावी किंवा जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली असावी. डॉ. अमोल देशमुख यांना ‘गोल्डन कार्ड जनरेशन’साठी, सतिश पवार यांना ‘१०० टक्के ज्येष्ठता याद्या प्रसिद्धी’साठी, तर परिक्षीत बारहाते यांना ‘ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विमा लाभ’ मिळवून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, बाळासाहेब बायस, बाळासाहेब रायबोले यांच्यासह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, जल व मृद संधारण अधिकारी सुनील जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय घाणेकर, शिक्षणाधिकारी सतिश मुगल, कृषी विकास अधिकारी मल्ला तोडकर आणि इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed