मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक घटना: अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू तर भाजपच्या महिला नेत्याला हृदयविकाराचा झटका – Mumbai News

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच, मीरा-भाईंदरमध्ये दोन अत्यंत धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एबी फॉर्म मिळवण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची प्रचंड झुंबड

.

मिळालेल्या माहितीनुसार, आपली कन्या श्रद्धा बने हिला भाजपकडून उमेदवारी नाकारली गेल्याच्या धक्क्याने माजी महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने यांची प्रकृती खालावली असून त्यांना तातडीने मिरा रोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली, तरी रुग्णालयातून त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया अत्यंत भावूक होती. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी असलेली निष्ठा आणि पक्षकार्यासाठी अंगावर घेतलेले खटले यांचा विचार न करता, ऐनवेळी डावलले गेल्याची भावना त्यांनी अश्रू अनावर होत व्यक्त केली. पक्षासाठी आयुष्य वेचूनही आज आपल्याकडे दुर्लक्ष झाले, अशा शब्दांत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली.

मीरा भाईंदरमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटाची युती तुटली

मीरा-भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती अखेर अधिकृतरीत्या तुटली असून, यावरून दोन्ही पक्षांतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन मेहता यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नरेंद्र मेहता यांचा अहंकार आणि घमेंडीमुळेच ही युती तुटली आहे. भाजपला सुरुवातीपासूनच शिवसेनेला सोबत घ्यायचे नव्हते. शहरात स्वतःचेच वर्चस्व राखणे आणि शिवसेनेला सातत्याने कमी लेखणे हीच भाजपची रणनीती होती, असा गंभीर आरोप सरनाईक यांनी केला.

युतीसंदर्भातील चर्चेचा तपशील सांगताना सरनाईक यांनी भाजपच्या वागणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला. चर्चेसाठी बोलावून आपल्याला तब्बल 50 मिनिटे ताटकळत ठेवले गेले आणि केवळ 13 जागांची अपमानास्पद ऑफर देण्यात आली, असा दावा त्यांनी केला. शिवाय, भाजपने सहकार्य केले तरच तुमच्या या 13 जागा निवडून येतील, असे अहंकारपूर्ण विधान करून शिवसेनेचा अपमान करण्यात आल्याचेही ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेने आता स्वतंत्रपणे लढण्याचा पवित्रा घेतला असून मीरा-भाईंदर महापालिकेच्या 95 पैकी 81 जागांवर शिवसेना आपले उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *