नांदेड – शहरातील दीपकनगर येथील सारनाथ बौद्ध विहारात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भगवान गौतम बुद्ध यांच्या शांतता, समता, बंधुता आणि मानवतेच्या संदेशाचे स्मरण करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणलेल्या धम्मक्रांतीच्या विचारांना उजाळा देत समताधिष्ठित समाजनिर्मितीचा संकल्प व्यक्त करण्यात आला.यावेळी अलका देवके, सूर्यकांता लोणे, सुमनबाई भवरे, मीरा सूर्यवंशी, ललिता वाठोरे, चंद्रकला इनायते, कमलबाई आळणे, छाया गोदणे, सुजाता कदम, वच्छला नरवाडे, आशा कांबळे, अम्रपाली गोवंत, कुसुम खंदारे, मीरा नरवाडे, रमा कांबळे, वंदना नरवाडे आणि शांताबाई कांबळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Post Views: 7
What do you feel about this post?
0%
Like
0%
Love
0%
Happy
0%
Haha
0%
Sad
0%