Aurangabad Election BJP Ticket Denial Protest Divya Marathe Hunger Strike | संभाजीनगर भाजप कार्यालयात ‘हायव्होल्टेज ड्रामा’: तिकीट कापल्याने दिव्या मराठे उपोषणाला; म्हणाल्या- स्वीकृत नगरसेवक करा, तरच उपोषण सोडणार – Chhatrapati Sambhajinagar News



तिकीट कापल्यामुळे नाराज असणाऱ्या प्रभाग क्र.20, गादीया विहारच्या भाजप कार्यकर्त्या दिव्या मराठे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. पक्षाच्या सर्वेक्षणात नाव असताना निष्क्रीय कार्यकर्त्याला तिकीट देण्याचा जाब त्यांनी विचारला. आता स्विकृत नगरसेवक पदावर न

.

मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या भाजप प्रचार कार्यालयात हाय व्होल्टेज ड्रामा झाला. दिव्या मराठे यांनी याबाबत पक्षश्रेष्ठींना जाब विचारण्यासाठी प्रचार कार्यालय गाठले. यावेळीच त्यांनी तिकीट मिळेपर्यंत उपोषणाचा इशारा दिला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 वाजेची वेळ संपल्यावर भाजप कार्यालयात शुकशुकाट होता. मात्र, दिव्या मराठे एकट्याच येथे उपस्थित होत्या. कार्यालयातील स्टेजवर असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली सतरंजी टाकून त्यांनी उपोषणाला सुरूवात केली.

दिवसभरात मंत्री अतुल सावे, खासदार डॉ.भागवत कराड, आमदार संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे किंवा अन्य कोणाकडूनही फोन आला नाही. कोणी विचारणा केली नाही. मुंबईहून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कार्यालयातून विचारणा झाली. मात्र, स्विकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. रात्री 10 वाजेपर्यंत त्यांचे उपोषण सुरू होते.

दिव्या मराठे 18 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहे. अतुल सावे यांनी त्यांचे सर्वेक्षणात नाव आल्याचे सांगितले होते. मात्र, शितोळे नाव नसल्याचे सांगतात. पक्षातील नेत्यांमध्येच समन्वय नसल्याचा आरोप त्यांनी केला. 2010 मध्येही ऐनवेळी त्यांना एबी फॉर्म नाकारला होता. यावेळीही त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *