Parsoda Devi Valgaon Road Deteriorated Villagers Demand Repair | परसोडा देवी-वलगाव रस्त्याची दुरवस्था, नागरिकांना त्रास: तातडीने दुरुस्तीची गावकऱ्यांची मागणी, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन – Amravati News



परसोडा देवी-वलगाव रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे.

चांदूरबाजार तालुक्यातील परसोडा देवी-वलगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी परसोडा देवी येथील गावकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता (एसडीई) यांना निवेदन दिल

.

परसोडा देवी ते वलगाव या रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून आतील दगड बाहेर आले आहेत. तसेच, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

या खराब रस्त्यामुळे दुचाकी चालवणे अत्यंत अवघड झाले आहे. हा रस्ता परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि रुग्णवाहिकांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

रस्त्यावरील दगड बाहेर आल्याने वाहने घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होते. ग्रामस्थांनी गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक निवेदने दिली आहेत.

निवेदन सादर करतेवेळी मुन्ना बोंडे, रणजित टेकाडे, अभी निंभोरकर, नाना भोंडे, राहुल निंभोरकर, कैलास लगड, शरद निंभोरकर, नंदू निंभोरकर, नंदकिशोर गुबरे, दीपक टेकाड आणि अनिल निंभोरकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *