Solapur Municipal Election AIMIM Leader Farukh Shabdi Resignation Create Political Shock | सोलापूरमध्ये एमआयएम पक्षाला मोठा धक्का: प्रदेश कार्याध्यक्ष फारूख शाब्दिंचा राजीनामा, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय – Solapur News
![]()
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच सोलापूरमध्ये एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दि यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळब
.
फारुख शाब्दि यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडणूक लढवली होती. या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला असला, तरी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मोठी मते मिळवून आपली भक्कम पकड सिद्ध केली होती. त्यांच्याकडे सोलापूर शहराध्यक्ष, मुंबई शहराध्यक्ष आणि प्रदेश कार्याध्यक्ष अशा अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी अखेर पक्षाला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
सोलापुरातील कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवार एमआयएममध्ये
कॉंग्रेस पक्षाने सोलापूर आणि कोल्हापूर येथील उमेदवारांची यादी जाहीर केली असून कोल्हापुरात 48 तर सोलापूरमध्ये 20 उमेदवारांची पहिली यादी कॉंग्रेसने जाहीर केली होती. मात्र, सोलापूरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या यादीतील उमेदवाराने थेट एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या फिरदोस पटेल यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सोलापूरच्या प्रभाग क्रमांक 16 च्या कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी आज एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. इच्छुकांची मुलाखत घेताना अपमानास्पद वागणूक दिल्याचे कारण फिरदोस पटेल यांनी पुढे केले आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारूख शाब्दि आणि निरीक्षक अन्वर सादात यांच्या उपस्थितीत फिरदोस पटेल यांनी प्रवेश केला आहे. फिरदोस पटेल या कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. 2017 मध्ये सोलापूर महापालिकेत त्या निवडून आल्या होत्या.
