छत्रपती संभाजीनगरातल्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत महानगरप्रमुख रेणुकादास वैद्य यांनी भाजप प्रवेश केला. ते प्रभाग नंबर 27 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आम्हाला स्थानिक उमेदवार देण्
.
महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून, संभाजीनगरमधील वास्तव परिस्थिती, स्थानिक प्रश्न आणि राजकीय भूमिका नागरिकांसमोर मांडण्यासाठी ‘दिव्य मराठी’ ॲपने सुरू केलेल्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ ही विशेष मालिका सुपर हिट झालीय. या टॉक शोला प्रभाग क्रमांक 27 मध्येही प्रचंड प्रतिसाद मिळाला.
दरम्यान भाजपचे पदाधिकारी आकाश मोरे म्हणाले की, छत्रपती शिवाजीनगरला मित्रपक्ष म्हणून शिंदे गटाचे नगरसेवक होते त्यांनी जे काही विकास कामे केली त्याला विरोध नाही पण भाजचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे कुठलेच कामे त्यांनी केली नाही व त्यांनी विकासाच्या नावावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील निळा ध्वज काढण्याचे काम त्यांनी केले, असा आरोप आकाश मोरे यांनी केला आहे.
निवडणूक अजून वर्षभर लांबली तरी चालेल
एका तरुण मतदारांनी म्हटले की, आमच्या प्रभागात निवडणुकीसाठी आमच्याच प्रभागातील माणूस असेल तर योग्य वाटेल. इतर प्रभागातील लोकांना राजकीय पक्षाने उमेदवारी देऊ नये. आमच्या समस्या काय आहेत त्यांना कळणार नाहीत. स्थानिक उमेदवार द्यावा, 4 किमी दूर राहणारा नगरसेवकाना आमच्या भावना समजू शकत नाहीत, असे म्हणतात सर्व पक्षाच्या इच्छुकांनी या मागणीला समर्थन दिल्याचे दिसून आले. आमच्याकडे दुषित पाणी येते याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. निवडणूक अजून वर्षभर लांबली तरी चालेल पण आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे.
.. तर आम्हाला मान्य नाही
यावर बोलताना भाजपच्या पदाधिकारी अंजुषा कुलकर्णी म्हणाल्या की, मी गेली 40 वर्षे आम्ही याच प्रभागात राहते, इथे पक्षासाठी काम करते, मी काम करण्यात कमी पडत असेल तर तुम्ही बाहेरचा उमेदवार आणा पण जर गलेगठ्ठ आहे म्हणून कुणाला तिकीट दिले जात असेल तर आम्हाला मान्य नाही. आम्हाला प्रभागाची भीती दाखवली जात आहे, सामान्य माणसाचे काम नाही हे ठरवणारे तुम्ही कोण असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्ष स्वपक्षावर टीका केली आहे.

भुयारी मार्ग नाही तर गटारी मार्ग
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विनोद सोनवणे म्हणाले की, आमच्या प्रभागातील 60 टक्के परिसर हा असा असा आहे की या ठिकाणी पाणीच नाही. 40 टक्के परिसरात सर्व सुख सोयी आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने पास केलेल्या बजेटमधील रस्ते पूर्ण झाले आहे. आमच्या प्रभागात पाण्याच्या 3 टाक्या बांधून पूर्ण झाल्या आहेत, 2 चे काम सुरू आहे. पण गेली अनेक 20 वर्षे असलेल्या टाकीकडे कुणाचेही लक्ष नाही. शिवाजीनगरचा मार्ग हा भुयारी मार्ग नाही तर गटारी मार्ग आहे. त्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला.
नागरिकांच्या समस्या का सोडवल्या नाही?
काँग्रेसचे सलमान नवाब पटेल म्हणाले की, आमच्या प्रभागतील 75 टक्के भागात काहीही कामे झालेली नाही. आमच्याकडे मोठे रस्ते नाहीत, अनेक ठिकाणी कचरा पडलेला असतो. आमच्या परिसरातील 20 बाय 30 ची घरे आहेत त्यांना 8 दिवसाला पाणी मिळते. त्यांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. सत्ताधारी पक्षाची 20-25 वर्षे मनपावर सत्ता आहेत मग यांनी या काळात नागरिकांच्या समस्या का सोडवल्या नाही. आम्ही निवडून आलो किंवा नाही तरी आम्ही लोकांसाठी काम करणार आहोत.

शिवाजीनगरचा अंडर बायपास हा सेल्फी पॉऊंट
मनसेचे संकेत शेटे म्हणाले की, आमच्या प्रभागातील सर्वात मोठी समस्या पाण्याचीच आहे. पाण्यासाठी आम्ही आयुक्ताच्या घरचे कनेशन कट केले होते.या प्रभागातील नगरसेवक 2 ते 3 वेळा निवडून आले आहेत, ते पाणी का देऊ शकले नाही? आम्ही जनतेसाठी आंदोलन करत असतो त्यातून जनतेच्या समस्या सोडवण्याकडे आमचा कल आहे. शिवाजीनगरचा अंडर बायपास हा सेल्फी पॉऊंट झाला आहे.
पाणी योजनेचे केवळ उद्घाटन
राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाराम मोरे म्हणाले की, 257 कोटी रुपयांची पाणी योजना ही 3000 कोटी रुपयांपर्यत जाऊन पोहचली आहे पण शहराला अजून पर्यंत पाणीपुरवठा झालेला नाही. यासाठी पालकमंत्री, मंत्री आणि शहराचे नेतृत्व ज्यांनी केले अशी सर्व मंडळी कारणीभूत आहेत. माझ्या नगरसेवकाच्या कार्यकाळात जनतेला पाणी मिळावे यासाठी मी अनेक प्रयत्न केले पण टाकीत पाणी नसेल तर नळाला पाणी येणार कुठून? या टाक्याचा वापर आठवड्यातील 1 ते 2 दिवसच केला जातो बाकी दिवस टाक्या रिकाम्या असतात. यासाठी सत्ताधारी जबाबदार आहेत. पाणी योजनेचे केवळ उद्घाटन करत आहे. जुन्या नेत्यांना बाजूला सारत नव्या उमेदवचारांना संधी दिली पाहिजे.

मोदींच्या कार्यकाळातच कामे झाली
भाजपच्या पदाधिकारी अंजुषा कुलकर्णी म्हणाल्या की, गेल्या 70 वर्षांमध्ये जी कामे झाली नाहीत ती सर्व कामे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर 10 वर्षांत करण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे यांनी पाण्यासाठी काहीच कामे केली नाही. यांना आता निवडणुकीच्या तोंडावर पाणी प्रश्न आठवतो. आमच्या नगरसेवकाने चांगले काम केले आहे. आम्हाला स्थानिक नगरसेवक मिळायल हवा.
स्वा.सावरकर संशोधन केंद्रासाठी प्रयत्न करणार
भाजपचे रेणुकादास वैद्य म्हणाले की, मी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर पक्ष ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मी प्रभाग बदललेला नाही, विद्या नगरचा 50 टक्के भाग माझ्या या मतदारसंघात आहे. मी त्या भागात 10 वर्षे काम केलेले आहे. संधी मिळत असल्याने या भागात काम करत आहे. स्वा.सावरकर संशोधन केंद्रासाठी निधी मंजूर झाला नाही ते व्हावे, त्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निधी उपलब्ध करुण देतील निवडणुकीनंतर हे काम पूर्ण होईल.

प्रभागाची व्याप्ती नेमकी कशी?
प्रभाग क्र 27 चा विचार केला तर गजानन महाराज मंदिरापासून सुरू होणारा प्रभाग रेल्वे पटरीच्या पलिकडे बीडबायपास पर्यंत पसरलेला आहे. यामध्ये नेहरू कॉलेज, गारखेडा गाव, शिवाजीनगर, देशमुख नगर,नाथ प्रांगण, एमराल्ड सिटी,रेणुका नगर, भारत नगर,गणेश नगर, नवनाथ नगर,आनंद नगर, आशा नगर, न्यु बालाजी नगर, चैतन्य हाउसिंगसोसायटी, गजानन कॉलनी,स्वप्ना नगरी, मेहर नगर,तिरुपती विहार भागशः, मोतीवनगर, सारा राजनगर, सारंग सोसाईटी, विजयनगर, साहस सोसायटी, देशमुखनगर,सह्याद्री होल, मानकनगर,आर.बी. हॉल, मुथीयान,तिरुपती विहार शहा परिसर येतो. यामध्ये 46 हजार 350 इतकी लोकसंख्या आहे.
या आहेत प्रमुख समस्या
छत्रपती संभाजीनगरातील प्रभाग क्र 27 मध्ये या प्रभागाचा विचार केला तर गजानन मंदिर ते बीडबाय पास इतका मोठा परिसरा या प्रभागात येतो. शिवाजीनगर अंडर बायपास परिसरात होणारी वाहतूक कोंडी, पाण्याच्या समस्या, रस्त्यावर लागणाऱ्या हातगाड्या याच्यासह ओपन स्पेपकडे झालेले दुर्लक्ष यासारखे अनेक प्रश्न या प्रभागात आहेत.
