Khopoli Murder Mangesh Kalokhe Attack City Tension Relatives Demand Police Suspension Investigation Search | पोलिस निरीक्षक सचिन हिरेंना निलंबित करा: मृत मंगेश काळोखेंच्या कुटुंबीयांची मागणी; शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक – Mumbai News



खोपोली नगरपालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची शुक्रवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, आपल्या जीवाला धोका असल्याची पूर्वक

.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 7 वाजता मंगेश काळोखे यांच्यावर हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला. काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या या हल्लेखोरांनी काळोखे यांची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

माझ्या भावाच्या जीवाला धोका असल्याचे त्याने आधीच लेखी स्वरूपात पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांना कळवले होते. आरोपी रवींद्र देवकर आणि त्याचे साथीदार शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती देऊनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या हत्येला पोलिस प्रशासनच जबाबदार आहे, असा खळबळजनक आरोप मयत मंगेश यांचे आतेभाऊ संदेश पाटील यांनी केला आहे. सचिन हिरे यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला.

पोलिस ठाण्यात राडा, कार्यकर्त्यांची धक्काबुक्की

या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींच्या अटकेसाठी शिवसैनिकांनी खोपोली पोलिस ठाण्यावर धडक दिली. यावेळी संतप्त जमावाने ठाण्यातच ठिय्या मांडला. जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठी धक्काबुक्की झाली, ज्यामुळे काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती.

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह 10 जणांवर गुन्हे

या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून, पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचाही समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

खोपोली हादरली:शिंदे गटाच्या नगरसेविकेचे पती आणि माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

रायगड जिल्ह्यातील खोपोली शहर आज सकाळी घडलेल्या एका भीषण घटनेमुळे हादरून गेलं आहे. खोपोली नगरपालिकेच्या शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पती मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या हत्येने खोपोलीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मंगेश काळोखे हे स्थानिक पातळीवर परिचित व्यक्तिमत्त्व होते आणि यापूर्वी त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम पाहिलं होतं. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *