Maharashtra Municipal Elections Ajit Pawar Group Star Campaigners Strategy | महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले!: अजित पवार गटाकडून 40 ‘स्टार प्रचारकांची’ यादी जाहीर; कोणाकोणाची नावे? – Mumbai News


राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून 15 जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आपली रणनीती स्पष्ट करत 40 ‘स्टार प्रचा

.

निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्या पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी अजित पवार गटाने अनुभवी नेत्यांसह युवा चेहऱ्यांनाही या 40 स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिले आहे. आगामी काळात होणाऱ्या सभा आणि प्रचाराच्या फेऱ्यांमध्ये हे नेते राज्यभर फिरून पक्षाची भूमिका मांडणार आहेत. सुनील तटकरे यांनी या यादीची घोषणा केल्यानंतर आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या निवडणुकीत अनेक अनपेक्षित युती पाहायला मिळत आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युतीबाबत अंतिम चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही राष्ट्रवादी गटांनी देखील एकत्र निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरू केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *