Maharashtra Municipal Election BJP Victory Defeat Nitesh Rane Reaction Analysis | सिंधुदुर्गात बाहेरचे, घरचे सगळे फॅक्टर होते: युती का झाली नाही याचे उत्तर नीलेशजींकडेच, कणकवलीच्या पराभवावर नितेश राणे स्पष्टच बोलले – Mumbai News



नगरपालिकेच्या निवडणुकांचा रविवारी निकाल लागला आणि महायुतीने विशेषतः भाजपने सर्वाधिक जागा जिंकत महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे सिद्ध केले आहे. अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली. परंतु, महाविकास आघाडीला या निवडणुकीत फारशी चांगली कामगिरी

.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्गात ज्या काही चार नगरपालिका होत्या, त्यात प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढला. एक चांगली बाब अशी आहे की भाजप म्हणून आज सिंधुदुर्गमध्ये आमचे 41 नगरसेवक निवडून गेले आहेत आणि 2 नगराध्यक्ष आहेत. जे काही कणकवलीमध्ये झाले त्याचे विचार आम्ही करत आहोत. तिथे सगळे फॅक्टर होते, घरचे, बाहेरचे, या सगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करत आहोत.

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, कणकवली हा नारायण राणे साहेबांचा बालेकिल्ला आहे. त्यांचे जन्मस्थान सुद्धा हेच आहे आणि त्याच कणकवलीमध्ये सन्माननीय राणे साहेबांच्या अवतीभवती ज्या काही निवडणुका झाल्या आणि त्यावर जे काही झाले, प्रचार, अपप्रचार झाला, गैरसमज पसरवण्यात आला. आज कणकवलीमध्ये राणे साहेबांचाच खंदा कार्यकर्ता समीर नलावडे यालाच पाडले गेले आणि ते सुद्धा राणे साहेबांच्याच कुटुंबाच्या मदतीने. या सगळ्यावर निश्चितपणे बोलले जाईल आणि विस्तृतपणे माहिती दिली जाईल.

युती का झाली नाही याचे उत्तर नीलेश राणेंकडेच आहेत

शिवसेना शिंदे गटाचे नेते नीलेश राणे यांनी असे म्हटले होते की सिंधुदुर्गात राणे साहेबांचा शब्द पाळला गेला नाही. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, मुळात महायुती का झाली नाही, याचा विचार आदरणीय नीलेशजींनी करायला पाहिजे. त्यांच्याकडेच उत्तर देखील आहेत. नीलेश राणे यांना आमदार बनवण्यात भाजपच्या तसेच शिवसेनेच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचा पाठिंबा होता. मग 11 महिन्यात, आमदार झाल्यापासून आत्तापर्यंत ज्या पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांना वागवले गेले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटले की आम्हाला धमक्या शिव्या-शापच दिल्या जात असतील तर त्यांचे म्हणणे झाले की आम्ही आमचा अपमान सहन करत आलो आहोत, मग आम्ही त्यांच्यासोबत युती का करावी? त्यामुळे स्वबळाचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *