![]()
वसमत पालिका निवडणुकीत शनिवारी ता. २० मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून दुपारी साडेतीनवाजे पर्यंत महिलांच्या मतदानाची टक्केवारी ५७.४४ टक्के तर पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ५५ टक्के होती. त्यामुळे आता लाडक्या बहिणी कोणत्या बहिणीला विजयाचा गुलाल ला
.
वसमत पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी नगरसेवक पदाच्या १५ प्रभागातील ३० जागांसाठी शनिवारी ता. २९ मतदान प्रक्रिया पार पडली आहे. शहरातील ७२ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आली. मतदान काळात कुठेही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या शिवाय ड्रोनच्या माध्यमातून संवेदनशील मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या भागात पाहणी केली. तर उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सर्व मतदान केंद्रावर लक्ष ठेवले होते.
दरम्यान, सकाळी कडक्याच्या थंडीमुळे पहिल्या दोन तासात मतदान संथ होते. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत केवळ ९ टक्के मतदान झाले होेते. तर त्यानंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी साडे आकरा वाजेपर्यंत २०.९६ टक्के तर दुपारी दिड वाजेपर्यंत ३९.६१ टक्के मतदान झाले होते.
दरम्यान, दुपारनंतर मतदानाची टक्केवारी चांगलीच वाढली होती. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५६.२२ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये ५९८५५ मतदारांपैकी ३३६४८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये १६५०१ पुरुष तर १७१४१ महिला मतदारांनी मतदान केले आहे. महिला मतदारांची टक्केवारी ५७.४४ टक्के तर पुरुष मतदारांची मतदानाची टक्केवारी ५५ टक्के झाली होती. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अंदाजे ६८ टक्के मतदान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रविवारी होणार मतमोजणी
हिंगोली, कळमनुरी व वसमत पालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी ता. २१ सकाळी दहा वाजल्या पासून सुरु होणार आहे. त्यासाठी आवश्यक मतमोजणी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून प्रभागनिहाय फेऱ्या होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
