[ads1]
![]()
गणेशोत्सवाला सुरुवात होताच चंद्रपूर पोलिसांनी विनापरवाना डीजे वाजवणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. राजुरा शहरात परवानगीशिवाय मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या कारवाईत तब्बल 12 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुरा शहरातील नव्या बसस्थानकासमोर एका बोलेरो पिकअप वाहनातून मोठ्या आवाजात डीजे वाजवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ध्वनी प्रदूषण आणि विनापरवाना डीजेवर लक्ष ठेवले जात असतानाच ही बाब समोर आली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी डीजे वाजवण्यासाठी आवश्यक परवानगीबाबत संबंधितांकडे विचारणा केली. मात्र, डीजे वाजवण्यासाठी कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत डीजेचे संपूर्ण साहित्य ताब्यात घेतले. या प्रकरणी रवी एकवणकर आणि सचिन सरोज या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत 12 लाख 60 हजार रुपये असल्याची माहिती आहे. गणेशोत्सवापूर्वीच ‘नो डीजे, नो डॉल्बी’चा मुद्दा चर्चेत यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागांत ‘नो डीजे, नो डॉल्बी’चा मुद्दा चर्चेत आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात मोठ्या आवाजात डीजे आणि डॉल्बी वाजवल्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात पुण्यातील विद्यानंद बापट यांनी भूमिका मांडली होती. त्यानंतर या विषयाकडे प्रशासनाचेही लक्ष वेधले गेले. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिस आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा दाखला देत गणेशोत्सव पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यांत डीजे आणि डॉल्बीच्या वापराबाबत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मिरवणुकांमध्येही नियमांचे पालन करण्याचे आवाहन गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजातील ध्वनी यंत्रणेमुळे ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशांच्या गजरात आणि ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करत उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राजुरा येथे झालेल्या कारवाईमुळे विनापरवाना डीजे वाजवणाऱ्यांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे. यापुढेही उत्सवादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हेही वाचा .. ‘माय मरो पण मावशी जगो..!’:देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर अंबादास दानवेंचा खोचक टोला; काय आहे प्रकरण? “मराठी भाषा माझी आई, तर हिंदी माझी मावशी असून आईसोबत मावशीचाही सन्मान व्हायला हवा,” या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना दानवे यांनी त्यांना खोचक टोला लगावत, “मराठीत एक म्हण आहे. माय मरो पण मावशी जगो..! बरोबर ना फडणवीस साहेब,” असा टोला दानवे यांनी लगावला आहे. सविस्तर वाचा…
[ads2]
चंद्रपुरात गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांचा डीजेवर दणका:12 लाखांचे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
















Leave a Reply