[ads1]
![]()
गणेशोत्सवाच्या उत्साहात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. डबेवाडी येथे विनापरवाना गणेशमूर्ती आगमन मिरवणूक काढून डीजेचा वापर केल्याप्रकरणी सहा जणांवर, तर पाटखळ येथे पोलिसांच्या आदेशाला हरताळ फासत डॉल्बी आणि बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डबेवाडी येथे रविवारी (दि. 13) रात्री आठ ते दहा या वेळेत गणेशमूर्ती आगमन मिरवणूक काढण्यात आली. त्यासाठी परवानगी घेतली नसतानाही डीजेचा वापर करण्यात आला. पोलिसांनी यापूर्वी बीएनएसएस कलम 168 अन्वये नोटीस देऊन नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतरही उल्लंघन झाल्याने मयूर माने, आकाश चव्हाण, सुमित माने, विशाल माने, प्रज्वल माने आणि अनिकेत माने (सर्व रा. डबेवाडी) यांच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, पाटखळ येथील श्री संत गाडगे महाराज मित्र गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत रविवारी रात्री आठ ते साडेदहा या काळात डॉल्बी व बीम लाईटचा वापर करण्यात आला. बीम लाईट, लेझरच्या वापरावर पोलिस अधीक्षकांनी ३ सप्टेंबर रोजी निर्बंध घातले होते. तरीही आदेशाचे उल्लंघन केल्याने मंडळाचे अध्यक्ष रुपेश सोनटक्के, सिद्धांत सोनटक्के, रजत सोनटक्के, हणमंत सोनटक्के, नवनाथ सोनटक्के, गणेश सोनटक्के व प्रणय सोनटक्के यांच्यासह बीम लाईटप्रकरणी अभिजीत पवार आणि डॉल्बीप्रकरणी रजनीकांत नागे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
[ads2]
परवानगीशिवाय मिरवणुका, डीजे-डॉल्बी अन् बीम लाईट:सातारा तालुका पोलिसांचा दणका; संबंधितांवर गुन्हे दाखल
















Leave a Reply