[ads1]
![]()
गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमलेला मंडई परिसर, ढोल-ताशांच्या निनादाने भारावलेले वातावरण आणि फुलांनी सजविलेल्या भव्य पुष्परथातून झालेले शारदा गजाननाचे आगमन… अशा भक्तिमय वातावरणात पुण्याचे वैभव असलेल्या अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचे उत्सव मंडपात आगमन झाले. मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३३ वे वर्ष असून, आगमनानंतर दुपारी १२ वाजता डॉ. विनय थोरात आणि प्रतिभा थोरात यांच्या हस्ते हरिहर मंदिरात श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. यावेळी डॉ. पराग काळकर, डॉ. सतीश देसाई, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, ॲड. प्रताप परदेशी, जयंत किराड, संजय मते, अभय थोरात, मिलिंद काची, सचिव विश्वास भोर, सुरज थोरात यावेळी उपस्थित होते. अखिल मंडई मंडळ ते मंडई पोलीस चौकी, रामेश्वर चौक, गोटीराम भैया चौक, मेट्रो स्टेशन मार्गे उत्सव मंडप असा आगमन मिरवणुकीचा मार्ग होता. मिरवणुकीत समर्थ आणि तालचक्र ढोलपथकांसह न्यू गंधर्व बँड सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बँड पथक आणि वाद्यपथके होती. भव्य हरिहर मंदिरात विराजमान झाले शारदा गजानन — तब्बल ९० बाय ६० फूट आकाराच्या मंडपात २५ फूट उंचीचे हे मंदिर साकारण्यात आले आहे. हरिहर मंदिराची संकल्पना भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या एकात्मतेचा संदेश देणारी आहे. भाविकांना संबंधित देखावा बाबत उत्सुकता निर्माण झाल्याने मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. ————– हेही वाचा.. गणरायाचं आगमन, महाराष्ट्रात जल्लोष: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी देशभरासह राज्यभरात आजपासून लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले असून, मुंबईत गणेशोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. लालबागच्या राजापासून ते गणेश गल्लीपर्यंत बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविक आणि राजकीय दिग्गजांची गर्दी उसळली आहे. यंदा लालबागच्या राजाचा मंडप आणि बाप्पाचे स्वरूप ‘महादेव (शिव)’ थीमवर आधारित आहे. या देखाव्याच्या केंद्रस्थानी एक विशाल त्रिशूळ उभारण्यात आला असून बाप्पाचे रूप अत्यंत मनमोहक दिसत आहे. सविस्तर वाचा
[ads2]
मंडईच्या शारदा गजाननाचे भव्य पुष्परथातून आगमन:गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने मंडई दुमदुमली; 133 व्या वर्षाची हरिहर मंदिरात प्राणप्रतिष्ठापना
















Leave a Reply