छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीधारकांना महागाईचा धक्का:26 जानेवारीपासून सर्व्हिसिंग 300 ऐवजी 400 रुपयांना, कोणत्या सुविधा मिळणार? वाचा
![]()
शहरातील दुचाकीधारकांना आता आपल्या वाहनाच्या देखभालीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. औरंगाबाद टू-व्हीलर मेकॅनिक संघटनेने आयोजित केलेल्या मराठवाडा विभागीय मेळाव्यात दुचाकी सर्व्हिसिंगचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २६ जानेवारीपासून शहरात दुचाकी सर्व्हिसिंगसाठी ३०० रुपयांऐवजी ४०० रुपये आकारले जाणार असल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष सय्यद चाँद यांनी केली. तापडिया नाट्यमंदिरात पार पडलेल्या या मेळाव्यात मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांतील सुमारे २२०० मेकॅनिक उपस्थित होते. या वेळी नागपूरचे अध्यक्ष निशिकांत पोहनकर यांनी बदलत्या तंत्रज्ञानानुसार मेकॅनिक्सनी स्वतःला अपडेट करण्याचे आवाहन केले. आगामी काळात इलेक्ट्रिकल वाहनांच्या दुरुस्तीवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार असून, तालुक्याच्या ठिकाणी विशेष ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा आणि मेकॅनिक्सचा ग्रुप इन्शुरन्स काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही या मेळाव्यात घेण्यात आला. ४०० रुपयांत या सुविधा
