[ads1]
![]()
कोरडा दुष्काळ जाहीर होण्यासाठी शेतकरी दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. बार्शीटाकळी येथील जुन्या बस स्टँडसमोर जागर काळोख आंदोलन केले. रात्री ९ ते ३ पर्यंत काळोखात येथे दुष्काळ जागरण आंदोलन करीत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी एल्गार पुकारला. यंदाच्या प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला असून, शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत शासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने दुष्काळी उपाययोजना करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत द्यावी, अशी मागणी काळोख आंदोलनातून करण्यात आली. आंदोलन जुने बस स्टँड, बार्शीटाकळी येथे करण्यात आले. शेकडो शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने हे आंदोलन रात्री उशिरापर्यंत जोशपूर्ण वातावरणात पार पडले. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही हुसेन खान, भरत बोबडे, किरण ठाकरे, सुरेंद्र उगले, महादेव गावंडे, गणेश जाधव, प्रशांत गावंडे, अक्षय राऊत यांनी दिला.
[ads2]
शेतकऱ्यांचे रात्री 9 ते 3 वाजेपर्यंत दुष्काळासाठी जागरण आंदोलन:बार्शीटाकळीत पुकारला एल्गार, तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी
















Leave a Reply