गोव्यात समान नागरी कायदा लागू होणार का?:मोदींच्या मानेवर अमित शहा वेताळासारखे बसलेत, शहांना पंतप्रधान व्हायची घाई- संजय राऊत

[ads1]


समान नागरी कायदा लागू होणाऱ्या राज्यात गोवा किंवा ईशान्येकडील राज्य आहेत का याचा खुलासा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे, तिथे भाजप सत्तेत आहेत त्या गोव्यात सुद्धा समान नागरी कायदा लागू होणार का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर अमित शहा मुंबईत येताना चटई घेऊनच येतात आणि बसतात. हे व्यापारी लोकांचे शहर असल्याने व्यापारी इथे येतात. 21 राज्यात समान नागरी कायदा आणणे हा त्यांचा सध्याचा अजेंडा आहे. संजय राऊत म्हणाले की, या देशात एक संविधान असले पाहिजे, एक तिरंगा आणि एक कायदा असला पाहिजे. या विषयी दुमत नाही. पण याचा फायदा केवळ स्वत:च्या राजकारणासाठी आणि फायद्यासाठी करतात त्यावर आमचा आक्षेप आहे. अमित शहांना पंतप्रधान व्हायची घाई झाली आहे म्हणून ते सारखे मुंबईमध्ये येत असतात. पण संघाच्या मनात दुसरी व्यक्ती आहे. संघाच्या मनातील व्यक्ती अमित शहा नाहीत. पण शहा मी संघाचा अजेंडा राबवण्यासाठी किती फायदेशीर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. संघाच्या मनात महाराष्ट्र अन् मध्य प्रदेशातील व्यक्ती संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधानपदासाठी संघाच्या मनात महाराष्ट्रातील 2 तर मध्यप्रदेशमधील एक व्यक्ती आहे. यात अमित शहा कुठेही नाही. पण तरीही शहा यांची धडपड सुरू असेल तर ती त्यांना लखलाभ ठरो. शहांनी महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न केला आहे, मराठी माणसांचे त्यांनी मोठे नुकसान केले आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल काही वाटत नाहीच. मोदी-शहा यांना जबरी महत्तकांक्षा आहे. राम मंदिरासाठी अमित शहा यांनी केले, त्यासाठी करसेवक, राम भक्त, शिवसेना आणि संतांनी बलिदान दिले. शहांना संघाचा अजेंडाच माहिती नाही संजय राऊत म्हणाले की, संघाचा अजेंडा काय आहे हे अमित शहा यांना माहिती नाही. 370 कलम हटवणे फार सोपे आहे. एक विधेयक आणले बहुमत होते ते पास झाले. पण संघाचा अजेंडा आहे की पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर ताब्यात घेणे ते शहा पूर्ण करणार असतील तर आम्ही त्यांचे कौतुक करू. कागद्यावरचे अजेंडे महत्त्वाचे नाहीत. अमित शहा हे शिंदे गटाचे प्रमुख आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी त्याच्या वाहनातून प्रवास केला. मुंबईत शहांसाठी रस्ते बंद संजय राऊत म्हणाले की, मुंबईमध्ये गणेशोत्सवात गर्दी होईल म्हणून तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येऊ देत नाही. पण 56 वाहने घेऊन 5 रस्ते बंद करतात. अमित शहा यांच्यासाठी वाहतूक बंद केली जाते. शहांनी काहीही केले तरी ते पंतप्रधान होऊ शकणार नाहीत कारण देशाला ते नको आहेत. मोदींच्या मानेवर वेताळाप्रमाणे ते बसले आहेत. त्यांची काय कारणे आहेत मला माहिती नाही, पण संधी मिळताच मोदी त्यांना बाजूला सारतील. मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय दृष्टीने आंदोलनाची योग्य वेळ निवडली आहे. सरकारला कायदा-सुव्यवस्था राखायची असेल तर सरकारने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली पाहिजे. हे ही वृत्त वाचा समोरचा हिंदू नसेल तर सामान घेऊ नका:आमच्या सरकारमध्ये आधी हिंदूंचे हित, मगच इतर, हिंदूंना त्रास दिल्यास तांडव करू- नीतेश राणे
समोरचा व्यक्ती जर हिंदू असतील तरच त्यांच्याकडून सामान घेतले पाहिजे. समोरचा व्यक्ती जर हिंदू नसेल टीका लावत नसेल, त्याला हनुमान चालीसा किंवा गणपती बाप्पांची आरती आली पाहिजे तरच मी त्यांच्याकडून वस्तू विकत घेईल ही भूमिका प्रत्येक हिंदूंनी घेतली पाहिजे, असे भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे. आमच्या सरकारमध्ये पहिले हिंदूंचे हित पाहिले जाणार मग सर्वांना मोजणार हे आमच्या डोक्यात स्पष्ट आहे. कोणीही वळवळ करू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे. वाचा सविस्तर

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *