[ads1]
![]()
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामानबदल मंत्रालयाच्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण२०२६’ मध्ये छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिकेने १० लाखांपेक्षा अधिकलोकसंख्या असलेल्या देशातील ४८ प्रमुखशहरांच्या श्रेणीत थेट १६ वा क्रमांक पटकावलाआहे. यंदा पालिकेने उत्तुंग झेप घेत २०० पैकी१७८ गुण मिळवले. धूळ नियंत्रण, कचराव्यवस्थापन, उघड्यावर कचरा जाळण्यासअटकाव आणि नियमित यांत्रिकसाफसफाईमुळे शहरातील हवेची गुणवत्तामोठ्या प्रमाणावर सुधारली आहे. या क्रमवारीत मुंबई (२८ वा क्रमांक),देशाची राजधानी दिल्ली (२१ वा क्रमांक),बेंगळुरू (३२ वा क्रमांक), कोलकाता (३८ वाक्रमांक), चेन्नई (३५ वा क्रमांक) व नाशिक(२९ वा क्रमांक) यांसारख्या बड्या शहरांनामागे टाकत शहराने ही लक्षवेधी कामगिरीबजावली आहे. महापौर समीर राजूरकर,आयुक्त अमोल येडगे व घनकचरा विभागाचेउपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या नेतृत्वातराबवलेल्या चारस्तरीय उपाययोजनांमुळे हीक्रमवारी उंचावण्यास मदत झाली. राष्ट्रीय मानांकनामुळे केंद्राचा ‘एनसीएपी’ निधी वाढणार केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (एनसीएपी) शहरांच्याकामगिरीच्या आधारावर आर्थिक अनुदान दिले जाते. ३४ व्या स्थानावरून थेट१६ व्या क्रमांकावर घेतलेल्या भरारीमुळे छत्रपती संभाजीनगरला केंद्रसरकारकडून मिळणाऱ्या विशेष निधीच्या रकमेत मोठी वाढ होणार आहे. हावाढीव निधी शहरात नवीन ई-बस खरेदी करणे, हरित पट्टे विकसित करणेआणि आधुनिक यांत्रिक झाडू यंत्रे खरेदी करण्यासाठी वापरता येईल.थोडक्यात, सुधारलेल्या मानांकनामुळे शहराच्या विकासासाठी केंद्राची तिजोरीअधिक खुली होणार आहे. कचरा विलगीकरणावर भर स्वच्छ वायू सर्वेक्षणात छत्रपतीसंभाजीनगर पालिकेची कामगिरीवर्षानुवर्षे सुधारत आहे. मागील वर्षी(२०२५) शहर देशात ३४ व्या क्रमांकावरफेकले गेले होते. मात्र, पालिकेने धूळनियंत्रण, यांत्रिक स्वच्छता, ओला -सुका कचरा विलगीकरणावर विशेष लक्षकेंद्रित केले. परिणामी, यंदा शहराने १८स्थानांची मोठी झेप घेत देशात १६ व्याक्रमांकावर झेप घेतली. … रस्त्यांवरील धुळीचे काय? पावसानंतर शहरातील रस्त्यांवर धुळीचेलोट उठत आहेत. अनेक रस्त्यांचीझालेली चाळण, ठिकठिकाणी खोदूनठेवलेले रस्ते आणि उघड्यावर उडणारीधूळ यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.कागदावरील स्वच्छ हवा आणिरस्त्यांवरील प्रत्यक्षातील धुरळा यातीलतफावत मनपा कधी दूर करणार, असासवाल नागरिक उपस्थित करत आहे.
[ads2]
स्वच्छ वायू सर्वेक्षण, मुंबई, दिल्लीला मागे टाकत संभाजीनगर देशात 16वे:वर्गवारी वाढल्यामुळे केंद्र सरकारकडून निधी मिळण्याचा मार्ग सोपा
















Leave a Reply