MPSC Student Protest in Chhatrapati Sambhajinagar; Resignation Demand

[ads1]

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे MPSC विद्यार्थी, शिक्षक आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संयोजक अभिजित दीपके यांची बैठक झाली. या बैठकीत MPSC अध्यक्ष

.

MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र दौरा करण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले. आंदोलनाची पुढील रणनीती, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आयोगाच्या कारभाराबाबत जनजागृती करण्यासाठी हा दौरा करण्यात येणार आहे. या बैठकीस MPSC विद्यार्थी आणि शिक्षकांसह CJPचे संघटन प्रमुख अजिंक्य शिंदे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यावर बैठकीत सर्वसंमती झाली.

शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये निघाला आक्रोश मोर्चा

दरम्यान, शुक्रवारी (11 सप्टेंबर) MPSCच्या कारभाराविरोधात आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘आक्रोश मोर्चा’ काढला. हमखास मैदानापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित पवारही मोर्चात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहता पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

12 मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश

MPSC अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमधील पेपरफुटी, परीक्षांचे नियोजन, गट ‘ब’ परीक्षेतील कथित गैरप्रकार तसेच आयोगाच्या कारभाराशी संबंधित विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. विद्यार्थ्यांच्या वतीने एकूण 12 प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकारांची सखोल चौकशी करावी, परीक्षांचे नियोजन पारदर्शक पद्धतीने करावे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आयोगाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

आयोगाच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असल्याचा आरोप करत या सर्व प्रकारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून MPSCचे अध्यक्ष आणि सचिव यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी विद्यार्थ्यांनी केली.

शुक्रवारी झालेल्या आक्रोश मोर्चानंतर आता CJPच्या माध्यमातून आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे गणेश विसर्जनापर्यंत अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याचा निर्णय न झाल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतल्याने MPSCविरोधातील आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…

संतप्त शेतकऱ्यांचा अनोखा निषेध:वाळलेल्या पिकांची दहीहंडी, ‘देवा पाऊस पाड’ म्हणत सरकारला इशारा

जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरिपातील पिके धोक्यात आली असून, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी यांसह अनेक पिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत दहीहंडीच्या उत्सवावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात असल्याचा आरोप करत अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. सविस्तर वाचा..

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *