![]()
सुरेश धारिवाल यांनी धर्मदाय आयुक्तांकडील याचीके विरुद्ध उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात दाखल केलेले अपील मागे घेतले आहे. त्यावरून धर्मदाय आयुक्तांनी फेरफार अहवालही निकाली काढला असल्याने जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीतील वाद संपुष्टात
.
जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीत स्वर्गीय आबाजी नाना पाटील विरुद्ध सुरेश धारिवाल असे दोन गट पडले होते. अध्यक्ष आबाजी नाना पाटील यांचेसह काही सहकाऱ्यांनी सचिव म्हणून सुरेश धारिवाल यांनी दाखल केलेल्या २००८ ते २०१३ चे फेरफार प्रकरणी धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती.या याचिकेविरुद्ध धारिवाल यांनी छत्रपती संभाजी नगर खंडपीठात अपील दाखल केले होते. त्या सर्व याचिका धारिवाल यांनी स्वतः उपस्थित राहून खंडपीठातून अनपेक्षित पणे मागे घेतल्या आहेत. तसे पत्र धर्मदाय आयुक्त यांना प्राप्त झाले असून त्यावरून धर्मदाय आयुक्त यांनी धारिवाल्यांनी दाखल केलेले फेरफार निकाली काढले आहेत. यामुळे गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेला जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचा वाद संपुष्टात येणार आहे.
पुन्हा गटबाजीचे दर्शन प्रारंभी अध्यक्ष स्व.आबाजी नाना पाटील व सचिव सुरेश धारिवाल असे दोन गट पडले होते. नुकत्याच काही घडामोडी पाहता निकटवर्तीय समजले जाणारे पारस ललवाणी, सचिन बसेल यांच्यासह काही संचालक धारिवाल यांच्यापासून दुरावले. त्यामुळे पुन्हा दुफळी पडून जवळचेच मंडळ विरोधात गेल्याने धारिवाल यांनी शिक्षण संस्थेबाबत दाखल केलेल्या सर्व याचिका मागे घेतल्याची चर्चा आहे.
शाळेला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे ^गेल्या सात-आठ वर्षांपासून आपसातील वादामुळे न्यायालयीन लढा सुरू आहे. मात्र यामुळे शाळा शिक्षक व असंख्य विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली शाळेला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे. तालुक्याच्या विकासाबरोबरच शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या जामनेरातील शिक्षण संस्थेचाही विकास व्हावा हाच प्रामाणिक हेतू आहे. -सुरेश धारिवाल, जामनेर
