नांदेड (प्रतिनिधी)-मनपाचे वरिष्ठ लिपिक संतोष जोशी हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून आज निवृत्त झाले.
जोशी यांनी लिपीक म्हणून २०१० ते २०२६ पर्यंतच्या निवडणूकीमध्ये काम केलेले आहे तसेच लोकसभा व विधानसभा निवडणूकीत देखील काम केलेले आहे. तसेच दरम्यानच्या कालावधीत पार पडलेल्या पोटनिवडणूकीतही काम केलेले आहे.
त्यांनी मनपाच्या विविध विभागात काम केलेले असून आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडलेले आहे तसेच निवडणूक कालावधीत त्या-त्या वेळेसच्या अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करुन व अथक परिश्रम घेऊन सर्व निवडणूकीमधील कामे चोखपणे व लिलया पार पाडलेले असून महापालिका निवडणूक कामी आपला स्वतंत्र असा ठसा उमटविलेला आहे.
संतोष जोशी यांना २०२५-२६ च्या निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांच्या कामाची दखल घेऊन आयुक्त यांनी त्यांना २६ जानेवारी रोजी उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
संतोष जोशी, वरिष्ठ लिपीक हे ३० जून रोजी नियत वयोमानानुसार मनपा सेवेतून सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व मित्र परिवार, कर्मचारी, अधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
