![]()
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील एका 3 वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणी आज सत्ताधारी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आपल्याच सरकारला चांगलेच धारेवर धरले. आम्हाला मालेगाव प्रकरणात उत्तर हवे आहे. मी स्वतः मुलीचा बाप आहे. येथील प्रत्येकजण मुली
.
मालेगावच्या डोंगराळे गावात एका 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. गत 16 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते. या प्रकरणी 24 वर्षीय विजय खैरनार नामक तरुणाला अटक करण्यात आली आहे. आमदार सुहास कांदे यांनी आज लक्षवेधीद्वारे विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर उपस्थित नसल्याने ते चांगलेच संतापले. माझ्या लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी इथे मंत्री महोदय कोण आहे? असा सवाल त्यांनी केला. त्यावर दुसरे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ग्रामीणचे गृहराज्यमंत्री वरच्या सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला गेल्यामुळे या प्रश्नाला आपण उत्तर देणार असल्याचे सांगितले.
आम्ही काय सातवी नापास आहोत का?
भाजप आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी या चर्चेत हस्तक्षेप करत या गंभीर विषयावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उत्तर देतील असे सांगितले. त्यावर बावनकुळे म्हणाले, ही लक्षवेधी आपण उद्यासाठी राखून ठेवू. यामुळे सुहास कांदे चांगलेच संतापले. ते म्हणाले, मला गृहमंत्र्यांचे उत्तर हवे आहे. खात्याचे उत्तर हवे आहे. अध्यक्ष महाराज आम्ही काही सातवी नापास नाही. मला ग्रामीणच्या गृहमंत्र्यांकडून उत्तर हवे आहे. मी छगन भुजबळांना पाडून इथे आलो आहे. मी स्वतः मुलीचा बाप आहे. येथील प्रत्येकजण मुलींचा बाप आहे. आम्हाला मालेगाव प्रकरणात उत्तर हवे आहे.
सुहास कांदेंनी दिली प्रकरणाची सखोल माहिती
सुहास कांदे यांच्या या भूमिकेवर तालिका अध्यक्ष समीर कुणावर यांनी मंत्री आले की आजच लक्षवेधी घेण्याची ग्वाही दिली. त्यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर सभागृहात दाखल झाले. यावेळी आपली लक्षवेधी मांडताना सुहास कांदे म्हणाले, 16 नोव्हेंबर 2025 रोजी मालेगावच्या डोंगराळे गावात शेखर उर्फ विजय खैरनार नामक नराधमाने 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केला. खून केल्यानंतर तिला झाडाझुडपात फेकून दिले. ती बेपत्ता झाली म्हणून तिच्या पालकांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर हा नराधम पोलिसांसोबत त्या मुलीला शोधण्यासाठी फिरत होता.
3 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी त्याच दिवशी त्या आरोपीला अटक केली. त्यानंतर मी व माझ्या पत्नीने पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. तेव्हा आम्हाला कळले की, मृत मुलीची आई केवळ 23 वर्षांची आहे. तिने आतापर्यंत तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. ते लोक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगत आहेत. इथे बसलेल्या प्रत्येकाला बहीम किंवा मुलगी असेल. तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करायचा तिचा खून करायचा झाडा-झुडपात फेकून द्यायचे आणि ताठ मानेने त्या गावात पोलिसांसोबत फिरायचे. या राज्यात कायद्याची भीती राहिली नाही का? असा संतप्त सवाल सुहास कांदे यांनी यावेळी उपस्थित केला.
माझी मागणी कायद्यात बसत नाही. पण त्या नराधमाला जनतेच्या ताब्यात द्या. त्याचा मुडदा पडला पाहिजे. सरकारने या प्रकरणात एखादा चांगला वकील नेमला पाहिजे. ही केस फास्टट्रॅकवर चालवणार का? या प्रकरणात महिला न्यायाधीश असेल का? 3 वर्षीय मुलीला न्याय मिळेल का? नराधमाला फाशीची शिक्षा होईल का? या केसचा निकाल एका महिन्याच्या आत लागेल का? अशा विविध प्रश्नांची सरबत्तीही सुहास कांदे यांनी यावेळी बोलताना म्हणाले.
काय म्हणाले गृहराज्यमंत्री पंकज भोयर?
त्यानंतर पंकज भोयर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. सुहास कांदे यांनी मालेगाव प्रकरणाची विस्तृत माहिती दिली. पोलिस प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करण्यासाठी हायकोर्टाला विनंती करण्यात आली आहे. आपण कोर्टाला लवकरात लवकर दोषींवर कारवाई करण्याची विनंती करू शकतो, असे ते म्हणाले,
