Shiv Sena Prepares 165 Candidates for Pune Municipal Elections | पुणे मनपात युती करायची का नाही एकनाथ शिंदे ठरवतील: आमच्याकडे 165 उमेदवार तयार, निवडणुकीला ताकदीने सामोरे जाऊ- रवींद्र धंगेकर – Pune News



पुणे मनपासाठी शिवसेनेकडे 165 उमेदवार तयार आहेत. पुणे मनपासाठी युती होणार की नाही हे एकनाथ शिंदे ठरवतील. पण पुणे शहरात लढण्याची आमची तयारी आहे. पुण्याच्या विकासासाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत. प्रशासन चांगल्या पद्धतीने चालवण्याकरता भ्रष्टाचारापासून लां

.

रवींद्र धंगेकर म्हणाले की, पुण्यात काय विकास करायचा याचे सर्वांपेक्षा आम्हाला बऱ्यापैकी ज्ञान आहे. कारण भ्रष्टाचारामध्ये अडकणारा आमचा पक्ष नाही. मी स्वत: आणि पक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आणि चांगले प्रशासन आणि पुणेकरांच्या हिताचे काम करणार. आमचा जाहीरनामा जनतेमधून असणार आहे. पुणे मनपासाठी एकनाथ शिंदे जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असेल. त्यांनी महाराष्ट्रासाठी प्रचंड काम केले आहे त्यांच्या नेतृत्वात विधानसभा झाली आता स्थानिक स्वराज्य संस्थैची निवडणूक होईल.

पुणे शिवसेनेमध्ये मतभेद नाहीत

रवींद्र धंगेकर म्हणाले की, पुणे शिवसेनेमध्ये कुणाचेही मतभेद नाहीत. आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार आहोत. आम्ही एकत्र आहोत आमचा पक्ष प्रत्येक घरी पोहोचला पाहिजे ही आमची भूमिका आहे. युती होणार का नाही हे धोरण वरीष्ठ ठरवतील. जागावाटपाबाबत निर्णय हे शिंदें घेतील.

पुणेकरांच्या हितासाठी काम करणार

रवींद्र धंगेकर म्हणाले की, शिवसेनेकडून पुणे मनपासाठी गेली 2 दिवस अर्ज वाटप करण्यात येत आहे. अनेक पुणेकरांसह सामाजिक कार्यकर्ते आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी अर्ज नेले आहेत. पुणे मनपामध्ये 165 जागा आहेत आणि आमच्याकडे 165 उमेदवार तयार आहे. युती होणार की नाही हा विषय एकनाथ शिंदे आणि वरीष्ठ नेत्यांचा प्रश्न आहे. पण आमच्याकडे सर्व उमेदवार तयार आहेत. फार्म भरेपर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही पुणेकरांच्या हितासाठी असेल.

कार्यकर्त्यांना संधी देणार

रवींद्र धंगेकर म्हणाले की, यावेळेस निवडणुकीत आम्ही तरुणांना संधी देणार आहोत. सर्व सामान्य कार्यकर्त्याना यात संधी मिळावी या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत. निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे. पण अशाने यापुढे कार्यकर्ता दिसणार नाही. एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याला काही मर्यादा असतात. पण सामाजिक कार्यकर्त्यांना त्या मर्यादा नसतात ते कुठेही जाऊन प्रचार करू शकतात. कार्यकर्ता एक विचारसरणी समोर ठेवत काम करत असतो त्याला संधी देण्याचे काम आम्ही या निवडणुकीत करणार आहोत. कार्यकर्ता हरवत जात असताना त्यांना चेहरा देण्याचे काम शिवसेना करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *