![]()
उद्योजकांसह कामगारांसाठी महत्त्वाचे चौक असलेल्याव सर्वाधिक रहदारी असलेल्या सन फार्मा चौक व सह्याद्री चौक येथे दोन उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. गेल्या सहा दिवसांत या उड्डाणपुलासाठी तीन ‘पिलर’ उभारले आहेत. तीन पदरी हे दोन उड्डाणपुलाच
.
ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात नगर-मनमाड रस्त्याहून शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांना दोन चौकातील वाहतूक कोंडीत न अडकता थेट जाता येणार आहे. या दोन चौकात उड्डाणपुल झाल्यानंतर या मार्गावरून जाणाऱ्यांचा 32 मिनिटांचा वेळ वाचेल. नागापूर औद्योगिक वसाहतीतील सह्याद्री चौक व सन फार्मा याचौकात कामगार कामावरून निघत असल्यामुळे सकाळी 8.30 ते सकाळी 11.30 वाजेपर्यंत वसायंकाळी 4.30 ते 6.30 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. यातील सन फार्मा या चौकातून निंबळक रस्ता जातो, याच रस्त्यावर मोठे उद्योग आहेत.सहाद्री चौकातून औद्योगिक वसाहतीत जात असलेल्या रस्त्यावर बँका, उद्योग, एमआयडीसीचे कार्यालय, महावितरण मुख्य स्टेशन आहे. त्यामुळे दोन्ही चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत असते.
या उड्डाणपुलांसाठी निविदा प्रसिद्ध करून 15 ऑक्टोबर 2024 ला कार्यारंभ आदेशदेखील काढला होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी 3 ऑगस्टला या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन डीएसपी चौक येथून केले होते.
39 कोटीतून 3 पदरी 2 उड्डाणपूल
सह्याद्री व सन फार्मा चौकातून औद्योगिक वसाहतीत कामगांराबरोबरच मोठ्या कंटेनरची वाहतूक होते. या दोन्ही चौकांमध्ये तीन पदरी उड्डाणपूल होणार आहेत. दोन उड्डाणपुलासाठी 39 कोटी 36 लाखांचा खर्च होणार आहे. विशेष म्हणजे या दोन उड्डाणपुलाचे कॉस्टींग जागेवरच न करता दुसरीकडे कॉस्टिंग केले जाईल. खांब तयार करून तेथे क्रेनच्या सहाय्याने जोडले जाणार आहेत. त्यामुळे काम सुरु असताना होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
“डीएसपी’ चौकातील उड्डाणपुलाला ब्रेक
वर्दळीचे ठिकाण असलेल्या डीएसपी चौक व पुढे कोठला चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होते. डीएसपी चौकात उड्डाणपूल झाल्यानंतर प्रवाशांना थेट जाता येणे शक्य होणार होते. मात्र डीसपी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला मात्र ब्रेक लागला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्र्यांनी या कामाचे भूमिपूजन केले, मात्र या उड्डाणपुलाबाबत मात्र सध्या”जैसे थे” परिस्थिती आहे.त्याला काही राजकीय कांगोरे दिले जात आहे. राजकीय श्रेयवादातून या उड्डाणपुलाला ब्रेक लागल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
थेट सवाल विनायक पाटील, उपअभियंता बांधकाम विभाग 32 मिनिटांचा वेळ वाचेल
Q : दोन उड्डाणपुलाचे काम कधीपर्यंत होईल?
A : ऑक्टोबरपर्यंत हे दोन्हीउड्डाणपुल होतील.
Q : पहिल्या टप्प्यात काय काम होईल?
A : लोखंडी पिलर टाकल्यानंतर कॉस्टिंग केले जाईल.
Q : उड्डाणपुलाचे काय फायदेहोतील?
A- दोन उड्डाणपुलामुळे प्रवाशांचे 32 मिनिटे वाचतील.
