तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी चोपड्यात जन आंदोलन:जिल्हाधिकाऱ्यांकडे केली निलंबनाची मागणी




चोपडा तालुक्यात नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उत्खननाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही दुर्लक्ष करणारे चोपडा महसूल अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्या संपत्तीची ईडी, इन्कम टॅक्स व आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात यावी, या मुख्य मागणीसह विविध तक्रारींचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना दि.२५ रोजी सर्वपक्षीय व भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने देण्यात आले. यात म्हटले आहे की, चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या कार्यकाळात वाळू व गौण खनिज प्रकरणांमध्ये संशयास्पद दुर्लक्ष, विविध गंभीर अनियमितता, कर्तव्यातील कसूर, नागरिकांशी गैरवर्तन, शासकीय कामकाजातील दिरंगाई, पत्रकारांना मिळणारी अपमानास्पद वागणूक अशा अनेक तक्रारी संबंधित प्रशासकीय कार्यालयांकडे प्राप्त झालेल्या आहेत. उपलब्ध तक्रारी, वृत्तपत्रीय बातम्या, शासकीय नोटिसा व इतर कागदपत्रांवरून या प्रकरणांची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. दि.३ जून रोजी याविषयी पत्रकारांनी लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांनी स्वीकारले होते. त्यावर अद्याप पावतो कोणतीही कायदेशीर कारवाई तहसीलदार चोपडा, मंडळ अधिकारी चहार्डी भाग, तलाठी निमगव्हाण- तांदलवाडी यांच्यावर झालेली दिसून येत नाही. त्यामुळे चोपडा तालुक्यातील सर्व पक्षीय व भारतीय पत्रकार महासंघ यांच्यावतीने दि.२९ जून रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालय येथे विराट जन आंदोलन करण्यात येणार आहे. निवेदनावर माजी आमदार कैलास पाटील, मनसेचे नेते अनिल वानखेडे,भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक नरेंद्र पाटील काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय सोनवणे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे विजय पाटील , तालुकाप्रमुख शिवसेना (उबाठा) देवेद्र सोनवणे, पत्रकार संघटनेचे विलास पाटील, नंदलाल मराठे, डॉ.चंद्रकांत बारेला ,नारायण पाटील, सोनाली पाटील, शशिकांत देवरे, शशिकांत पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देते वेळी डॉ. चंद्रकांत बारेला,शशिकांत देवरे, नंदलाल मराठे,विलास पाटील,अमोल राजपूत आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी निवेदनकर्ते यांना सांगितले की, निलंबनाची बाब ही माझ्या अधिकार क्षेत्रात येत नसून चोपडा तहसीलदार यांच्या बाबतीतला अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल असे सांगितले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *