[ads1]
लोहा (प्रतिनिधी) – लोहा शहरातील मौजे संगुचीवाडी येथील जय महाराष्ट्र बार हॉटेलचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी बारमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी बारमधील देशी-विदेशी दारू तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख ८३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही चोरी ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे संगुचीवाडी येथील जय महाराष्ट्र बार हॉटेलच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडले. त्यानंतर बारमध्ये अवैधरीत्या प्रवेश करून बारमध्ये ठेवलेली देशी-विदेशी दारू आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ८३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या घटनेनंतर बारचे फिर्यादी गणेश बळीराम कोटेवाड, रा. कलंबर, ता. लोहा यांनी लोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे लोहा गुन्हा क्रमांक ३२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता-२०२३ मधील कलम ३३१(४), ३०५(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. बार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत
Post Views: 7
[ads2]
















Leave a Reply