संतापजनक! पुण्यात हुंड्यासाठी छळ; 25 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन
Crime News| पुणे (Pune) शहरात सासरच्या छळाला कंटाळून एका २५ वर्षीय तरुणीने स्वतःचे जीवन संपवल्याची अत्यंत संताप घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच घडलेल्या या प्रकरणामुळे मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पीडित कुटुंबाने आता न्यायाची मागणी केली आहे.
हुंड्यासाठी छळ आणि गुन्हा दाखल
चंदननगर (Chandannagar) भागात वास्तव्यास असलेल्या तेजस्विनी गोरख सोनवणे (Tejaswini Gorakh Sonawane) नावाच्या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास लावून घेतला. याप्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विवाहितेने दिलेल्या माहितीनुसार, सासरचे लोक चारचाकी वाहन तसेच फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहून रक्कम आणण्याचा तगादा लावत होते. यासोबतच सोन्याची अंगठी मिळवण्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. या सततच्या जाचाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले असून तिच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
बीडमधील गेवराईत दुसरी धक्कादायक घटना
अशीच दुसरी मन हेलावून टाकणारी घटना बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई (Gevrai) शहरात घडली असून येथे एका २० वर्षांच्या तरुणीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणात देखील सासरच्या मंडळींकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या पैशांच्या मागणीला कंटाळून तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
पूजा प्रमोद सुरवसे (Pooja Pramod Survase) असे मृत तरुणीचे नाव असून तिने गजानन नगर (Gajanan Nagar) येथील राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. मूळची परभणी (Parbhani) येथील असलेल्या पूजाचे वर्षभरापूर्वीच प्रमोद साईनाथ सुरवसे (Pramod Sainath Survase) याच्याशी लग्न झाले होते. व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून पती, सासू उषाबाई उर्फ जिजी साईनाथ सुरवसे (Ushabai alias Jiji Sainath Survase), सासरे साईनाथ बापुराव सुरवसे (Sainath Bapurao Survase), दीर गणेश साईनाथ सुरवसे (Ganesh Sainath Survase), जाऊ आरती गणेश सुरvसे (Aarti Ganesh Survase) आणि नणंद अर्चना तुळसे (Archana Tulse) यांनी तिचा छळ केल्याची तक्रार गेवराई पोलीस ठाण्यात (Gevrai Police Station) दाखल झाली आहे.
News Title: Crime News Pune and Beed Dowry Harassment Cases
