मुख्यमंत्री आमच्या मागण्यांवर सकारात्मक प्रयत्न करतायत:…तर सरकारविरोधात लढायला पुन्हा मैदानात उतरणार, जरांगेंचा इशारा
![]()
मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेणार असे आम्हाला प्रशासनाने सांगितले होते. त्या संदर्भात माहिती मागवण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या तरी कामे होऊ लागले आहेत. आता ते दमतील असे वाटत नाही ते काम करतीलच. काही जणांच्या घरात एकाला प्रमाणपत्र दिले दुसऱ्याला नाही हा विषय आम्ही प्रशासनाला सांगितले. काही जणांकडे पुरावे नाही, काही जणांकडे नोंद नाही. त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जावे ही आमची मागणी होती, त्यासाठी सरकार काम करत आहे. ज्या अडचणी येत आहे त्या अडचणी एकमेकांना सांगत चला. मराठा आरक्षणाच्या लढाईत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला आता गती मिळाली असून, सरकार या कामात आता दमणार नाही, असा विश्वास मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारने दिलेल्या शब्दाचा मान राखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या माध्यमातून सकारात्मक हालचाली सुरू आहेत. ..तर पुन्हा लढण्यासाठी मी तयार मनोज जरांगे म्हणाले की, प्रशासकीय पातळीवरील त्रुटी दूर करून हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील प्रत्येक बांधवाला कुणबी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे. सध्या सरकारच्या भूमिकेवर आमचा विश्वास आहे, पण जर पुन्हा दगाफटका झाला, तर सरकारविरोधात लढण्यासाठी मी पुन्हा मैदानात उतरणार, असा इशारा सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. सरकारने एसओपी तयार केली मनोज जरांगे म्हणाले की, हैदराबाद गॅझेटचा जर जीआर सरकारने काढला आहे तर त्यानुसार सरकारने प्रमाणपत्र देणं गरजेचे आहे. कारण हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाच्या नोंदी आहेत. त्यामध्ये संख्येचा उल्लेख आहे. या मागणीसाठी आपण 30 मे रोजी आंदोलन केले. त्यानुसार सुलभता आली पाहिजे आणि प्रमाणपत्र वाटप झाले पाहिजे, असे आदेश प्रशासनाकडून विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, यासाठी एसओपी तयार केली आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळतील आमच्यावर विश्वास ठेवा असे विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्याशी आमचे बोलणं झाले. हैदराबाद गॅझेटनुसार सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम करण्यात येणार आहे. फडणवीसांकडून मागण्याची दखल मनोज जरांगे म्हणाले की, सरकारने दिलेला शब्दांपैकी काही गोष्टी बाकी आहेत. पूर्ण नाही पण आम्ही थोडे समाधानी आहोत कारण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी त्या दिवशी जो शब्द दिला, तळमळ दाखवली. त्यांना त्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितले की मराठा समाजाला आरक्षण देऊयात. हैदराबाद गॅझेट हे त्यांच्या हक्काचे आहे. काम पूर्ण करा जिथे अडचण येईल तिथे मला सांगा असे मुख्यमंत्र्यांनी विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना सांगितले. त्यांच्या बोलण्यातून वाटते आहे की मराठवाड्यातील समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत. सरकार मराठा समाजाचा रोष अंगावर ओढून घेणार नाही. पण जर पुन्हा दगा फटका झाला तर मी सरकारपुढे लढण्यासाठी पुन्हा उभा राहणार. लोकप्रतिनिधींना समाजासाठी काम करावे मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का मिळत नाही याकडे स्थानिक आमदार आणि माजी आमदारांनी लक्ष दिले पाहिजे. सर्व लोकप्रतिनिधींना समाजासाठी काम केले पाहिजे. कक्ष तालुकास्तरापासून सुरू झाले पाहिजे.
