SIAC State Entrance Exam Aug 2; Free UPSC Training By Chandrakant Patil
![]()
उच्च शिक्षण विभाग आयोजित राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण २०२६ साठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET-2026-27) आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये केंद्
.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, उच्च शिक्षण विभागअंतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई (SIAC) मुंबईसह भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर, तसेच यशदा संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकादमी, पुणे या संस्थांमार्फत प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे.
या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे :
- ऑनलाइन अर्ज सुरू : १ जून २०२६
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३० जून २०२६
- परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख : २ जुलै २०२६
- सामायिक प्रवेश परीक्षा (ऑफलाइन) : २ ऑगस्ट २०२६
विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन पोर्टलद्वारे पसंतीचे प्रशिक्षण केंद्र निवडण्याची सुविधा दिली जाणार आहे. या संदर्भात www.siac.org.in या अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर माहिती, अभ्यासक्रम, पात्रता,अर्ज प्रक्रिया व इतर सूचना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
