अमरावतीत हायव्होल्टेज ड्रामा!:किरीट सोमय्यांच्या गाडीसमोर MIM नगरसेवकांचे 'रास्ता रोको' आंदोलन; पोलिसांशी बाचाबाची
![]()
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज अमरावती दौऱ्यावर असताना महापालिका परिसरात प्रचंड गोंधळ आणि राजकीय थरार पाहायला मिळाला. सोमय्या अमरावती महानगरपालिकेत एका बैठकीसाठी आले असता, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लीमीन (MIM) पक्षाच्या नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवला. आंदोलनकर्त्यांनी थेट किरीट सोमय्या यांच्या गाडीसमोर धाव घेत रस्त्यावर झोपून ‘रास्ता रोको’ सुरू केला, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून बळाचा वापर करत कारवाई एमआयएम कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली. पोलिसांनी आपल्यावर थेट हात उचलला आणि अमानुषपणे बाजूला केले, असा गंभीर आरोप एमआयएमच्या नगरसेवकांनी केला आहे. अखेर कडक सुरक्षेत पोलिसांनी सोमय्या यांना महापालिका इमारतीत प्रवेश करून दिला. अमरावतीतील वाढता राजकीय वाद अमरावती महानगरपालिका आणि जिल्ह्यातील विविध कथित घोटाळ्यांवरून किरीट सोमय्या यांनी गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडी आणि स्थानिक विरोधी नेत्यांना लक्ष्य केले आहे. सोमय्या जेव्हा जेव्हा अमरावतीत येतात, तेव्हा स्थानिक पातळीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो. ठाण्यात वृद्धाला परप्रांतीयाकडून मारहाणीचे प्रकरण:राज ठाकरेंसह श्रीकांत शिंदेंनीही फोनवरून साधला संवाद, प्रकृतीची केली विचारपूस ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. किरकोळ कारणावरून एका परप्रांतीय ओला चालकाने ज्येष्ठ नागरिकाला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकरणाने पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या दादागिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सविस्तर वाचा
