तोतया पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याची 65 हजारांची केली फसवणूक
हदगाव (प्रतिनिधी) – येथील एका घटनेत तीन अनोळखी व्यक्तींनी पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून एका वृद्ध व्यक्तीच्या पत्नीकडील सोन्याचे दागिने फसवून नेल्याची घटना समोर आली आहे.
दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी अंदाजे 11:40 वाजता मौजा पाथरड फाटा येथे तीन इसमांनी फिर्यादी मारोतराव नामदेवराव तवर (वय 75, रा. पिंपरी बुजरुग, ता. कळमनूरी) व त्यांच्या पत्नीकडे जाऊन तुमच्या परिसरात चोरी झाली आहे, तुमच्याकडील सोने आमच्याकडे सुरक्षिततेसाठी द्या अशी बतावणी केली. या आरोपींनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगून सुमारे 65,000 रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन तेथून पसार झाले.
या प्रकरणी मारोतराव तवर यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हदगाव पोलीस ठाण्यात तामसा गुन्हा क्रमांक 98/2026 भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 319(2) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. सदरचा गुन्हा तपास अधिकारी पोलीस अंमलदार गायकवाड यांच्याकडे आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणूकीपासून सावध राहावे. कोणीही अनोळखी व्यक्ती पोलीस असल्याचे सांगून सोने किंवा मौल्यवान वस्तू मागत असल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षात कळवावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा पोलीस अंमलदार गायकवाड गायकवाड, मो. 9622995681
Post Views: 4
