ऋषिकेश जैस्वालांना शिवीगाळ; शिवसैनिकांचा एकाला चोप:शहागंजमध्ये अतिक्रमण कारवाईवरून राडा
![]()
शहागंज भागात महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान जोरदार राडा झाला. मनपाचे पथक कारवाई करत असताना अचानक काही हातगाडी चालक आणि दुकानदार आक्रमक झाले. त्यांनी पथकावर धावून जात थेट संघर्षाची भूमिका घेतली. या गोंधळात संतप्त व्यापाऱ्यांनी मनपा कर्मचाऱ्यांना अद्वातद्वा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांनाही या व्यापाऱ्यांनी लक्ष्य करत शिवीगाळ केली. दरम्यान याप्रकरणी रात्री उशिरा सिकंदर नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या राड्याचे पडसाद रात्री उशिरापर्यंत उमटत राहिले. आपल्या नेत्याला झालेल्या शिवीगाळीची बातमी पसरताच ऋषिकेश जैस्वाल यांचे कार्यकर्ते जुन्या शहरात गोळा झाले. त्यामुळे मध्यरात्री शहागंज परिसरात दोन्ही गट आमनेसामने येण्याची चिन्हे निर्माण झाली आणि वातावरण कमालीचे तापले. शिवीगाळ करणाऱ्याला कार्यकर्त्यांनी चोप दिला. यावेळी माफी मागत असल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. खुर्चीवर बसून शिवीगाळ केली या राड्याचे पडसाद रात्री उशिरापर्यंत उमटत राहिले. आपल्या नेत्याला झालेल्या शिवीगाळीची बातमी पसरताच ऋषिकेश जैस्वाल यांचे कार्यकर्ते जुन्या शहरात गोळा झाले. त्यामुळे मध्यरात्री शहागंज परिसरात दोन्ही गट आमनेसामने येण्याची चिन्हे निर्माण झाली आणि वातावरण कमालीचे तापले. शिवीगाळ करणाऱ्याला कार्यकर्त्यांनी चोप दिला. यावेळी माफी मागत असल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बाजूंच्या जमावाला रोखत पोलिसांनी मध्यस्थी केली व सर्वांना शांत केले. काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये? पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्त यांना बोलवा. आम्ही आम्ही इथले बाप आहोत, आमचं कुणी वाकडं करू शकत नाही. आयुक्त असो की कुणी असो आम्ही कुणाच्या बापाला भीत नाही, प्रदीप जैस्वाल के बेटे को बुलाओ, असा शिवीगाळ करत असल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला.
