1 जून पासून परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहिम

0
WhatsApp-Image-2026-06-01-at-19.18.43.jpg

नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय विरोधी मोहिम;महिनाभरात (1739) गुन्हे दाखल, 25 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

 दिनांक 01 ते 31 मे, 2026 दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक  शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात गुटखा, मटका, जुगार, अवैध दारु विक्री, अवैध शस्त्र व इतर अवैध व्यवसायांचे विरोधात मोहीम उघडली होती.

नांदेड परिक्षेत्रात राबविण्यात आलेल्या सदर मोहिमे दरम्यान, गुटखा व्यावसायिकांविरुद्ध कलम 123 भारतीय न्याय संहिते अंतर्गत (32), महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत (350), महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये (988), शस्त्र अधिनियमान्वये (87), तर इतर अधिनियमाखाली (282), अशा एकूण (1739) कारवाया करुन, (2412) इसमांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून 25,01,26,237/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

परिक्षेत्रातील विविध घटकांनी या संदर्भात केलेली कारवाई पुढील प्रमाणे :

जिल्हा गुटखा मटका/जुगार दारु शस्त्र अधिनियम इतर केसेस
गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या
नांदेड 12 77,65,282 17 114 52,99,710 360 326 30,83,848 345 59 59,49,300 80 61 11,15,05,103 141
परभणी 9 11,12,739 15 66 18,57,036 121 123 14,33,000 127 12 3,10,800 19 50 5,39,53,742 106
हिंगोली 5 17,51,780 6 53 3,12,010 78 209 5,08,095 211 6 70,800 7 64 1,68,52,371 73
लातूर 6 15,00,940 10 117 55,68,905 242 330 25,52,420 331 10 8,000 12 107 2,87,30,356 111
एकुण 32 1,21,30,741 48 350 1,30,37,661 801 988 75,77,363 1014 87 63,38,900 118 282 21,10,41,572 431

जून पासून परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहिम :

 

नांदेड परिक्षेत्रात, संपूर्ण जून महिन्यात गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेअंतर्गत परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये अवैध गुटखा विक्री व वाहतूक तसेच अंमली पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री व तस्करी याविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे. सदर मोहीम ही संपूर्ण जून महिनाभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून, संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांना अवैध व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुटख्याविरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईसाठी दहा वर्षेपर्यंत, तर अंमली पदार्थांविरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईसाठी वीस वर्ष एवढ्या कारावासापर्यंतची शिक्षा असल्याने, संबंधितांनी अशा व्यवसायांपासून परावृत्त व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

‘ खबर‘ हेल्पलाइनचा वापर करा : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना देता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed