पिंपळवाडी पिराची येथे महिलांची छेडछाड:गुन्हेगाराला अटक
![]()
प्रतिनिधी | पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिराची येथे दोन महिलांची छेडछाड केल्याप्रकरणी एमआयडीसी पैठण पोलिसांनी सराईत गुन्हेगार तुकाराम वीर याला अटक करून त्याची गावातून धिंड काढली. ही कारवाई सोमवारी (१ जुन) रोजी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम वीर (रा. पिंपळवाडी पिराची, ता. पैठण) याच्या विरुद्ध यापूर्वीही एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात विविध गुन्हे व तक्रारी दाखल आहेत. (२९ मे) रोजी त्याने गावातील दोन महिलांची छेडछाड केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संबंधित महिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी रविवारी (३१ मे) रोजी आरोपीला अटक केली. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी आरोपीची पिंपळवाडी पिराची गावातून धिंड काढून नागरिकांमध्ये कायद्याबाबत जनजागृतीचा संदेश दिला. यानंतर आरोपीला पैठण येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मिलिंद घाटेश्वर व कर्तारसिंग सिंगल करीत आहेत. दोन महिलांची छेडछाड केल्याप्रकरणी एमआयडीसी पैठण पोलिसांनी तुकाराम वीर याला अटक करून त्याची गावातून धिंड काढली.
