मध्य प्रदेशात सेंधवा टोलजवळ कार-कंटेनरचा अपघात:गंगापूर व महालगावच्या दोघांचा मृत्यू
![]()
चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित कार गेली दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर मध्य प्रदेशातील सेंधवा येथीलमुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण कार-कंटेनर अपघातात गंगापूर व महालगाव येथीलदोन तरुणांचा मृत्यू झाला. अन्य दोघेजखमी झाले आहेत. गंगापूर येथील अनिकेत अनिल काळे(२९, रा. सिरजगाव, ह.मु. गंगापूर),ओंकार साबणे (गंगापूर), बद्रीनाथ प्रमोदनांगरे (२६, महालगाव, ता. वैजापूर)तसेच त्यांचा पुणे येथील मित्र भूषण हेचौघेजण कारने (एमएच ११ सीडब्ल्यू४६४४) मध्यप्रदेशातील इंदूरकडे जातहोते. सोमवारी सकाळी साडेसहा तेसातच्या सुमारास सेंधवा शहरापासूनसुमारे दहा किलोमीटरवर असलेल्याजामली टोल प्लाझाजवळ कारवरीलचालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रितकार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्यामार्गावर गेली. त्याचवेळी भरधाव वेगानेयेणाऱ्या कंटेनरला (यूपी २१ डीटी२९९६) कारची जोरदार धडक बसली.धडकेची तीव्रता इतकी होती की कारचक्काचूर झाली. बद्रीनाथ यांचा घटनास्थळीच मृत्यू : या भीषणअपघातात बद्रीनाथ नांगरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या अनिकेत काळे यांचा सेंधवा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
