सटाण्यातील स्मशानभूमीत अघोरी पूजा:मांत्रिकासह अज्ञातांवर गुन्हा

0
app_17803038876a1d480f087e9_1001594399.jpg




प्रतिनिधी | सटाणा शहरातील जुन्या अमरधाम (स्मशानभूमी) परिसरात पौर्णिमेच्या मध्यरात्री अघोरी स्वरूपाची पूजा व जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी सटाणा पोलिसांनी अज्ञात आरोपी आणि एका मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून संबंधितांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ३०) मध्यरात्रीच्या सुमारास दोन आलिशान चारचाकी वाहनांतून काही संशयित व्यक्ती जुन्या अमरधाम परिसरात आल्या. त्यांच्यासोबत भगवे वस्त्र परिधान केलेला एक मांत्रिक असल्याचे सांगितले जाते. या व्यक्तींनी चिता जाळल्या जाणाऱ्या ठिकाणी अघोरी स्वरूपाचा पूजाविधी केला. यासाठी अंडी, लिंबू, उडीद, कवड्या, कापूर, नारळ, पुष्प आणि कुंकू आदी साहित्याचा { उर्वरित पान. २ प्रतिनिधी | दिंडोरी पेठ तालुक्यातील मुख्य मार्ग असलेल्या आंबे-जोगमोडी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पेठ तालुक्याला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बससेवा, शालेय वाहतूक तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे चुकविताना अपघाताचा धोका वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *