Ladki Bahin Yojana | गुड न्यूज! ‘या’ लाडक्या बहिणींना 6000 रुपये मिळणार?

0
Ladki-Bahin-Yojana.webp.webp


Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नियमितपणे दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणाऱ्या काही पात्र महिलांच्या खात्यात गेल्या चार महिन्यांपासून अनुदान जमा झालेले नाही. अशा महिलांना आता थकीत रक्कम एकरकमी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक महिलांच्या खात्यात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे हप्ते जमा झालेले नाहीत. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आता अशा महिलांसाठी दिलासादायक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चार महिन्यांचे हप्ते प्रलंबित असलेल्या महिलांना एकूण 6000 रुपये देण्याचा विचार केला जाऊ शकतो. ही रक्कम एकदाच किंवा दोन टप्प्यांमध्ये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक महिलांनी आवश्यक कागदपत्रे आणि ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करूनही पैसे न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी होती. त्यामुळे या निर्णयाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.

Ladki Bahin Yojana | दोन टप्प्यांत जमा होऊ शकते थकीत मदत :

मिळालेल्या माहितीनुसार, प्रलंबित रक्कम दोन भागांत लाभार्थींच्या खात्यात जमा केली जाऊ शकते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांसाठी 3000 रुपये, तर एप्रिल आणि मे महिन्यांसाठी आणखी 3000 रुपये अशा पद्धतीने एकूण 6000 रुपयांचा लाभ देण्याची शक्यता आहे. यामुळे चार महिन्यांपासून प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो.

दरम्यान, ई-केवायसी पडताळणीदरम्यान सुमारे 80 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ज्या महिला पात्र असून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही त्यांना अनुदान मिळालेले नाही, त्यांच्याबाबत हा प्रस्ताव चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप राज्य सरकारने यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा किंवा स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे 6000 रुपयांच्या थकीत रकमेबाबत अंतिम निर्णय आणि अंमलबजावणीसाठी लाभार्थींना अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवावे लागणार आहे.

News Title: Pending Ladki Bahin Funds Soon

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed